शिवज्योत आणताना टेम्पोला अपघात: अपघातातील जखमी 13 वर्षीय मुलाचा रुग्णालयात मृत्यू


पुणे32 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

शिवज्याेत घेऊन येत असताना मावळ तालुक्यातील शिलाटणे गावचे रहिवासी असलेल्या कार्यकर्त्यांच्या टेम्पाेला अपघात झाल्याची घटना घडली हाेती. यामध्ये ३० जण जखमी झाले हाेते व त्यांच्यावर तीन ते चार रुग्णालयात उपचार सुरु आहे. या अपघातत गंभीर जखमी झालेल्या आर्यन साेमनाथ काेंडभर (वय-१३) असे उपचारा दरम्यान गुरुवारी मयत झालेल्या दुर्देवी मुलाचे नाव आहे.

Advertisement

मुंबई बंगळुरु महामार्गावर शिवज्याेत घेऊन जाणाऱ्या टेम्पाेला मालवाहू भरधाव ट्रकने पाठीमागून जाेरात धडक दिल्याची घटना १० मार्च राेजी घडली हाेती. या अपघातात ३० ते ३५ जण जखमी झाले हाेते. त्यानंतर जखमींना उपचारासाठी तीन वेगवेगळया रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. त्यापैकी दहा जणांची प्रकृती गंभीर हाेती तर २० जण किरकाेळ जखमी झालेले हाेते.

सर्व कार्यकर्ते हे मावळ तालुक्यातील शिलाटणे गावचे रहिवासी असून मल्हारगडावरुन शिवज्याेत आणण्यासाठी ते खासगी टेम्पाेने गेलेले हाेते. ते परतत असताना, बंगळुरु -मुंबई महामार्गावर ताथवडे परिसरात त्यांच्या टेम्पाेला ट्रकने पाठीमागून जाेरात धडक दिल्याने भीषण अपघात घडला हाेता. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने कार्यकर्त्यांना रुग्णालयात उपचारासाठी हलवले हाेते.

Advertisement

मुख्यमंत्री सहाय्यता मधून उपचार

संबंधित अपघाताची घटना घडल्यानंतर मावळ तालुक्याचे माजी आमदार व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली हाेती. त्यानंतर त्यांनी सदर कार्यकर्त्यांचा उपचार हा मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून केली. त्यानुसार मुख्यमंत्री यांनी सदर कार्यकर्त्यांचा आैषधउपचाराचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून केला जाईल असे सांगितले. नुकतेच त्यांच्या आराेग्य विभागाचे कामकाज पाहणाऱ्यांनी साेमटणे फाटा येथील पवना रुग्णालयात जखमींची भेट घेऊन डाॅक्टरांकडून माहिती घेतली हाेती.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement