मुंबई9 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
सत्तासंघर्षावर अजूनपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नसताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सरकारचे काउंट डाऊन सुरू, शिवजयंती पुर्वी महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होणार हे नक्की. असे वक्तव्य केले आहे. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सुद्धा ‘मुंगेरी लालके हसीन सपने’ असे म्हणत प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
आमदार अमोल मिटकरी यांनी दावा केला आहे की, येत्या शिवजयंतीपूर्वी राज्यात सत्ताबदल होऊ शकतो. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यापूर्वी महिनाभरात राज्यात मोठी उलथापालथ होणार का याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
आमदार अमोल मिटकरी यांचे ट्विट.
सरकार कोसळणार
आमदार अमोल मिटकरी म्हणाले, 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करत असतो. त्यापूर्वी सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊन हे सरकार कोसळणार. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार येणार कि राष्ट्रपती राजवट लागणार हे सांगू शकत नाही. महाराष्ट्रात शिंदे आणि फडणवीस सरकारचे आयुष्य 15 ते 20 दिवसांचे राहिले आहे.
सरकारला 7 महिने पूर्ण
प्रवीण दरेकर यांनी अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. दरेकर म्हणाले, ‘मुंगेरी लालके हसीन सपने’ असेच त्याला याठिकाणी म्हणावे लागेल. संजय राऊत यांनी देखील तारखा सांगितल्या होत्या. मात्र आज सरकारला 7 महिने पूर्ण होत आहेत.
नियोजनबद्ध स्ट्रॅट्रेजी
प्रवीण दरेकर म्हणाले, मला वाटते त्यांनी अशाचप्रकारे भविष्य सांगत राहावे. आपले चांगले कार्यकर्ते जे शिंदे गटात किंवा भाजपमध्ये जात आहेत. त्यांना थांबवण्यासाठी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी नियोजनबद्ध स्ट्रॅट्रेजी आखत आहेत.