पुणे9 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
”महाराष्ट्रात पुन्हा भाजपचे सरकार येणार आहे. कर्नाटकमधील भाजपच्या पराजयाची चर्चा होत आहे. मात्र ज्यांची एकही जागा निवडून आली नाही. ते बडवत आहेत, ज्यांच्या घरी पोरगा झाला नाही ते देखील आनंद साजरा करत आहेत.” असा जोरदार टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज पुण्यात भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजप कार्य समितीची बैठक झाली. यानंतर कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संबोधताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
हे सरकार संविधानिक
देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या भाषणात उद्धव ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला. शिल्लकसेना म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे गटाने केलेल्या मागण्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्या नाहीत, त्यामुळे हे सरकार संविधानिक आहे. राजीनामा देतो आणि देणे यातील फरक शरद पवारांनी ठाकरेंना सांगितला.
पुन्हा भाजप सरकार येईल
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात पुन्हा आपली सत्ता येणार आहे. महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न लागू करणार असे काहीजण सांगत आहेत. मात्र अल्पसंख्यांकांचे ध्रुवीकरण करुन महाराष्ट्रात जिंकता येणार नाही. महाराष्ट्रात एकच पॅटर्न चालेल मोदी पॅटर्न आणि भाजप पॅटर्न.
आमची युती भक्कम
देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजप आणि शिवसेनेची युती भक्कम आहे. आपला निवडून येण्याचा फार्म्युला मोदीजींची कार्यशैली, सामान्यांच्या विकासाचा आपला नरेटीव्ह आहे. मनसुख हिरेन यांची हत्या उघड करुन आम्ही मविआचे वसुली रॅकेट बंद केले असा दावाही त्यांनी केला.