आयपीएलच्या ६८ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळा गेला. राजस्थानने चेन्नई सुपर किंग्जचा पाच विकेटने पराभव केला. राजस्थानच्या विजयात खरा हिरो ठरला अश्विन. त्याने ४० धावांची नाबाद खेळी खेळली आणि १ विकेट घेतला. चेन्नईने या पराभवासह हंगामाचा शेवट केला. या हंगामात चेन्नईला १४ पैकी फक्त 4 सामने जिंकता आले. परंतु संघासाठी चांगली गोष्ट म्हणजे पुढच्या हंगामात धोनी पुन्हा एकदा चेन्नईचा कर्णधार म्हणून खेळणार आहे.
कालच्या राजस्थान आणि चेन्नई यांच्यातील सामन्यात मोईन अली आणि अश्विनने चाहत्याचे मन जिंकले. दुसरीकडे सामन्यादरम्यान कॉमेंट्री करताना सुनील गावसकर यांनी शिमरॉन हेटमायर वर काही बोलले आणि त्याला आता वादाचे रूप मिळाले आहे. गावसकर यांच्या कमेंटवर चाहते सोशल मीडियावर टीका करत आहेत. राजस्थानला विजयासाठी ५२ चेंडूत ७५ धावांची गरज होती. त्यावेळी राजस्थानकडून क्रीझवर फलंदाजीला हेटमायर आला. तेव्हा गावसकर यांनी त्यांच्यासाठी असे काही शब्द वापरले ज्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. गावसकर म्हणाले, शिमरन हेटमायरच्या पत्नीची प्रसूती झाली आहे. हेटमायर आता राजस्थानसाठी डिलिव्हरी करेल का?
आयपीएल २०२२ मध्ये शुक्रवारी राजस्थान रॉयल्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी झाला. या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १५० धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान संघाला चांगली सुरुवात मिळाली. परंतु त्यानंतर संघाने पटापट विकेट्स गमावल्या, ज्यामुळे सामना त्यांच्या हातून निसटत चालला होता. अशात वेस्ट इंडिजचा धाकड फलंदाज शिमरॉन हेटमायर फलंदाजीसाठी मैदानावर उतरला. यावेळी समालोचक सुनील गावसकर यांनी जे विधान केले, त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
गावसकर यांच्या या वक्तव्यानंतर चाहते आता सोशल मीडियावर जोरदार टीका करत आहेत. काही चाहते त्याला कॉमेंट्रीमधून काढून टाकण्याची मागणीही करत आहेत. मात्र हेटमायरला या सामन्यात विशेष काही करता आले नाही आणि तो ७ चेंडूत ६ धावा करून बाद झाला. गावसकर यांनी यापूर्वी आयपीएल २०२० मध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्माबद्दल टिप्पणी केली होती आणि त्यानंतरही त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.
हेटमायर त्याच्या पहिल्या बाळाच्या जन्मासाठी काही दिवसांची सुट्टी घेऊन घरी परतला होता. यामुळे तो काही सामनेही खेळू शकला नव्हता. मात्र चेन्नईविरुद्धच्या सामन्यातून त्याने संघात पुनरागमन केले. यशस्वी जयस्वालची विकेट गेल्यानंतर हेटमायर १५व्या षटकात फलंदाजीसाठी आला होता. यादरम्यान गावसकर राजस्थान-चेन्नई सामन्याचे इंग्रजीमध्ये समालोचन करत होते. यापूर्वी अशाचप्रकारे गावसकर क्रिकेटपटूच्या पत्नीबद्दल वादग्रस्त प्रतिक्रिया देत टिकाकारांच्या निशाण्यावर आले होते. आयपीएल २०२० मध्ये त्यांनी विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माबद्दल विधान केले होते, ज्यामुळे त्यांना टिकेला सामोरे जावे लागले होते.
हेटमायर फलंदाजीसाठी खेळपट्टीवर उतरताच गावसकरांनी विधान करत म्हटले की, “शिमरॉन हेटमायरच्या पत्नीने डिलीव्हर केला आहे, आता हेटमायर राजस्थानसाठी डिलीव्हर करेल का?”. गावसकरांच्या या विधानानंतर चाहते सोशल मीडियावर त्यांना फटकारत आहेत. काही चाहत्यांनी तर गावसकरांना त्यांच्या या विधानामुळे समालोचणाच्या पॅनेलमधून हटवण्याचीही मागणी केली आहे. दरम्यान हेटमायर ७ चेंडूत ६ धावा करून बाद झाला. त्याला प्रशांत सोलंकीने डेवॉन कॉन्वेच्या हातून झेलबाद केले.
दरम्यान चेन्नई विरुद्ध राजस्थान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, चेन्नईकडून प्रथम फलंदाजी करताना मोईन अलीने सर्वाधिक ९३ धावा केल्या होत्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर चेन्नईने राजस्थानला १५१ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात सलामीवीर यशस्वी जयस्वालचे अर्धशतक (५९ धावा) आणि आर अश्विनच्या नाबाद ४० धावांच्या जोरावर राजस्थानने ५ विकेट्स राखून हा सामना जिंकला.