शिक्षा: धनादेश अनादर प्रकरण; तीन महिने कैदेची शिक्षा, 15 लाखांची भरपाई


छत्रपती संभाजीनगरएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

धनादेश अनादर प्रकरणात काकासाहेब जऱ्हाड यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा आणि तक्रारदार सुरेश जाधव यांना १५ लाख ८ हजार २२० रुपयांची भरपाई दोन महिन्यांत देण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एच. खेडकर यांनी दिले. रक्कम वेळेत न दिल्यास अतिरिक्त दोन महिने शिक्षा भोगावी लागणार आहे.

Advertisement

तक्रारदार सुरेश जाधव हे लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत. जाधव आणि जऱ्हाड हे दोघेही २००९ पासून मित्र होते. २०११ मध्ये ते दोघेही भागीदार म्हणून काम करत होते. दरम्यानच्या काळात जाधव यांच्याकडून जऱ्हाडने रक्कम हातउसनी घेतली होती. तक्रारदारांतर्फे ॲड. आर. के. पठाण यांनी काम पाहिले.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement