शिक्षणात बाद झालेल्या पण क्रिकेटमध्ये नाबाद राहिलेल्या खेळाडूची कहाणी, कोण आहे तो वाचा…

शिक्षणात बाद झालेल्या पण क्रिकेटमध्ये नाबाद राहिलेल्या खेळाडूची कहाणी, कोण आहे तो वाचा...
शिक्षणात बाद झालेल्या पण क्रिकेटमध्ये नाबाद राहिलेल्या खेळाडूची कहाणी, कोण आहे तो वाचा...

रिंकू सिंहने सामन्याच्या आदल्या रात्री हातावर लिहून ठेवले होते की तो कोलकाता नाईट रायडर्सला सामना जिंकून देणार. सामन्यात त्याने स्वत:ला दिलेला शब्द खरा करून दाखवला. उत्तर प्रदेशच्या अलीगढ येथील रिंकू सिंहने काल आयपीएल २०२२ मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात २३ चेंडूत नाबाद ४२ धावा केल्या. रिंकूने २०१८ साली आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तरी देखील राजस्थान विरुद्ध तो करिअरमधील १३वी सामना खेळत होता. या पाच वर्षात रिंकूला नियमितपणे संधी मिळत नव्हती. पण जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने आंतरारष्ट्रीय स्तरावरील गोलंदाजांची धुलाई केली.

राजस्थानविरुद्धच्या सामन्याआधी रात्री झोपताना रिंकूने हातावर लिहले होते की, ‘५० धावा नॉटआउट…’; मला मनातून असे वाटत होते की मी आज धावा करेन आणि मॅन ऑफ द मॅच देखील होईन. म्हणूनच स्वत:हून हातावर ५० धावा लिहून हार्ट तयार केले. “अलीगढच्या अनेक खेळाडू रणजी स्पर्धेत खेळले आहेत. पण आयपीएलमध्ये खेळणार मी पहिला खेळाडू आहे. मोठ्या स्पर्धेत प्रेशर देखील अधिक असते. मी गेल्या पाच वर्षापासून या संधीची वाट पाहत होतो.”

Advertisement

केकेआरने सामना झाल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. नितीश राणासोबतच्या या व्हिडिओमध्ये रिंकू म्हणतो, मला आतून असे वाटत होते. खुप वेळ या गोष्टीची वाट पाहत होतो. केव्हा मला मॅन ऑफ द मॅच मिळले. ५ वर्षानंतर चांगला डाव खेळण्याची संधी मिळाली. केव्हा मी केकेआरसाठी ५० धावा करेन…केव्हा मी सामना जिंकून देऊन… पाच वर्षानंतर वेळ आली पण चांगली आली.

Advertisement

मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने २० षटकात ५ बाद १५२ धावा केल्या. उत्तरादाखल केकेआरने १९.१ षटकात ३ विकेटच्या बदल्यात विजय मिळवला. कर्णधार श्रेयस अय्यरने राणा सोबत तिसऱ्या विकेटसाठी ६० धावा केल्या. अय्यर ३४ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या रिंकूने पहिल्या चेंडूवर चौकार मारून इरादा स्पष्ट केला. रिंकू आणि राणा यांनी ३४ चेंडूत ५० धावा करत संघाला विजय मिळवून दिला. आयपीएल २०१७ साली रिंकूला पंजाब किंग्जने १० लाख रुपयांना संघात घेतले होते. तेव्हा त्याला एकच सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. २०१८ साली तो केकेआर संघात आला. २०२२च्या लिलावात रिंकूला ५५ लाखांना खरेदी केले होते.

Advertisement