शिक्षक, सुविधांच्या अभावी घटली सरकारी शाळांची विद्यार्थी संख्या: सर्व शासकीय शाळांमध्ये वर्षभरात २९,३५९ विद्यार्थी घटले

शिक्षक, सुविधांच्या अभावी घटली सरकारी शाळांची विद्यार्थी संख्या: सर्व शासकीय शाळांमध्ये वर्षभरात २९,३५९ विद्यार्थी घटले


स्वप्नील सवाळे | अमरावती33 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक
  • यू-डायस प्रणालीतून वास्तव उघड, शाळांचा दर्जाही घसरला

मनुष्यबळाच्या अभावामुळे शासकीय शाळांमधील शिक्षणाचा दर्जा घसरला. सोबतच शाळा, वर्गखोल्या, आधुनिक तंत्रज्ञानासह भौतिक सुविधा नसल्यामुळे २०२२-२३ या एका शैक्षणिक वर्षात या शाळांमधील पहिली ते बारावीचे २९ हजार ३५९ विद्यार्थी घटले आहेत. युडायस प्रणालीतून हे वास्तव उजेडात आले. शासकीय शाळांपेक्षा खासगी शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा उत्तम असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी भौतिक सुविधाही पुरेशा असल्याने खासगी शाळांकडे विद्यार्थ्यांसह पालकांचा ओढा वाढल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

मागील २०२१-२२ या शैक्षणिक सत्रात जि. प., नगर पालिका, महापालिका, अनुदानित अशा सर्व शासकीय शाळांमध्ये एकूण ४ लाख ९८ हजार ७६१ विद्यार्थी होते. त्यात २९ हजार ३५९ ने घट झाल्यामुळे २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात ४ लाख ६९ हजार ४०२ विद्यार्थी शासकीय शाळांमध्ये सध्या शिकत आहेत. मागील काही वर्षांपासून सातत्याने विद्यार्थी संख्येत घटत असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले तरी ती कमी करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याचे वास्तव आहे.

मुख्याध्यापकांचीही पदे रिक्त, एकाच शिक्षकाकडे चार ते पाच वर्गांची जबाबदारी‎

Advertisement

जिल्ह्यातील शासकीय शाळांमध्ये १ हजारावर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. ८५ टक्क्यांपेक्षा जास्त शाळांमध्ये प्रभारी मुख्याध्यापक व दोन-तीन वर्गाचा तोच शिक्षक अशी स्थिती आहे. अनेक शाळांत एकही नियमित शिक्षक नसून नियुक्तीच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान करत शिक्षक नसलेल्या शाळा चालवल्या जात आहेत. एका शिक्षकाला दोन-तीनच नव्हे तर अनेक ठिकाणी चार ते पाच वर्ग चालवावे लागतात. मुख्याध्यापकाचा प्रभार, शिक्षक कमी असल्याने इतर वर्ग व अन्य जबाबदारी टाकली तर शिक्षक विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकत नाही. याउलट खासगी शाळेत शिक्षक, अद्ययावत सुविधा मिळतात. यामुळे पालक पाल्यांचे प्रवेश खासगी शाळेत करतात.

– राजेश सावरकर, राज्य प्रसिद्धी प्रमुख, प्राथमिक शिक्षक समिती.

Advertisement

पाल्याला चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे ही अपेक्षा

मी जि.प. शाळेतून शिक्षण घेतले. मात्र, सध्या तेथील शिक्षणाचा दर्जा खालावला आहे. खासगी शाळांची संख्या तसेच त्यामध्ये अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आम्ही पाल्याच्या शिक्षणासाठी खासगी शाळेला पसंती दिली आहे. कोणत्याही पालकांना आपल्या पाल्याला चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे, अशी अपेक्षा असते.

Advertisement

– अनिरुद्ध उगले, पालक.

नया अकोला येथील शाळेला ठोकले कुलूप

Advertisement

जिल्ह्यातील नया अकोला येथील जि. प.च्या माध्यमिक शाळेत शिक्षक नसल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे. अनेक वेळा निवेदन देऊनही शिक्षक न मिळाल्याने अखेर संतप्त ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकून रोष व्यक्त केला. मात्र चार दिवसांपासून शाळा बंद असूनही शिक्षण विभागाने कोणतीही दखल घेतली नाही. शैक्षणिक सत्र २०२३ – २४ सुरू होऊन तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला. मात्र जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये शिक्षकच नाहीत. असाच प्रकार नया अकोला येथील जि. प. शाळेबाबत झाला. येथे दहावी व नववीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकच नाहीत.



Source link

Advertisement