शिक्षक, पदवीधर मतदारसंघाचे मतदार कोण?: कशी असते निवडणूक प्रक्रिया? जाणून घ्या सविस्तर…


 • Marathi News
 • Dvm originals
 • Graduate & Teacher Election Process; Vidhan Parishad Election | NCP BJP Congress | NCP All You Need To Know

मुंबई3 तासांपूर्वी

Advertisement
 • कॉपी लिंक

राज्यात सध्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या रिक्त होत असलेल्या 5 जागांची निवडणूक येत्या 30 जानेवारीला होणार आहे. 2 फेब्रुवारी रोजी या निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊया विधान परिषदेतील या मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया कशी असते ते.

Advertisement

सर्वात आधी पाहूया कोणत्या जागांवर निवडणूक होत आहे

विधान परिषदेचे 3 शिक्षक मतदारसंघ आणि 2 पदवीधर मतदारसंघांत निवडणूक होणार आहे. ते खालीलप्रमाणे

Advertisement

1. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ – विद्यमान आमदार विक्रम काळे(राष्ट्रवादी काँग्रेस)

2. नागपूर शिक्षक मतदारसंघ – विद्यमान आमदार नागो गाणार (अपक्ष)

Advertisement

3. कोकण शिक्षक मतदारसंघ – विद्यमान आमदार बाळाराम पाटील (अपक्ष)

4. नाशिक पदवीधर मतदारसंघ – विद्यमान आमदार सुधीर तांबे (काँग्रेस)

Advertisement

5. अमरावती पदवीधर मतदारसंघ – विद्यमान आमदार रणजीत पाटील (भाजप)

आता निवडणूक कार्यक्रमावर एक नजर टाकूया…

Advertisement

या मतदारसंघात निवडणुकीची अधिसूचना 5 जानेवारी रोजी जारी झाली. त्यानुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी आहे. तर 13 जानेवारीला अर्जांची छाननी होईल. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी आहे. 30 जानेवारी रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान होईल. 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. या पाचही जागांची मुदत 7 फेब्रुवारी रोजी संपत आहे.

आता जाणून घेऊया या मतदारसंघातील मतदान प्रक्रियेविषयी

Advertisement

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका दर सहा वर्षांनी होतात. या निवडणुकांसाठी नोंदणीकृत शिक्षक आणि पदवीधर मतदार मतदान करतात. यासाठी पात्र शिक्षक तसेच पदवीधरांना प्रत्येकवेळी नव्याने नोंदणी करणे आवश्यक असते. पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या मतदारांनी निवडणुकीच्या आधी मतदार म्हणून नोंदणी करायची असते. त्यानंतर ते या निवडणुकीत मतदान करू शकतात.

आता पाहूया निवडणूक प्रक्रियेबद्दल

Advertisement

विधानसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेत थेट निवडणूक प्रकिया होत नाही. इथे राष्ट्रपती, सिनेटसारख्या निवडणुकीतील पसंतीक्रमाची पद्धत वापरली जाते. संबंधित मतदारसंघाची मतदारसंख्या आणि उमेदवार यांच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करते. निर्धारित कोट्याएवढी प्रथम क्रमांकांची मतं मिळवणारा उमेदवार विजयी होतो. पहिल्या पसंतीची मतं कोट्याएवढी नसल्यास दुसऱ्या पसंतीची मतं जो पूर्ण करील तो उमेदवार विजयी होईल. निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो. यात कोणाचेही मतदान वाया जात नाही.

गुप्त मतदान मोठा मुद्दा

Advertisement

विधानपरिषद निवडणुकीत सर्वांत मोठा मुद्दा गुप्त मतदानाचा आहे. राज्यसभेत खुलं मतदान असल्याने पक्षाच्या आमदारांना मत दाखवून टाकावं लागतं. पण विधान परिषदेत आमदार गुप्त मतदान करतात. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता नेहमी व्यक्त केली जाते. निवडणुकीसाठी जितके मतदार उभे असतील तेवढ्या उमेदवारांना पसंतीक्रम देता येतो.

आता जाणून घेऊया विधान परिषदेची रचना कशी असते

Advertisement

1956 च्या 7 व्या घटनादुरूस्तीनुसार असे निश्चित करण्यात आले आहे की, विधानपरिषदेची सदस्य संख्या तेथील विधानसभेच्या सदस्य संख्येच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त नसावी आणि 40 पेक्षा कमी नसावी. सध्या महाराष्ट्र विधान परिषदेत 78 इतकी सदस्य संख्या आहे. घटनेच्या कलम क्र. 171/2 नुसार विधानपरिषदेच्या रचनेबाबद कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. विधानपरिषदेतील सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेले सदस्य नसतात. विधानपरिषदेत साधारणपणे पाच षष्टमांश सदस्य निर्वाचित असतात तर एक षष्टमांश सदस्य राज्यपाल नियुक्त असतात.

सदस्यांची विभागणी

Advertisement
 • 1/3 सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात.
 • 1/3 स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात.
 • 1/12 शिक्षक मतदार संघातून सदस्य निवडले जातात.
 • 1/12 पदवीधर मतदार संघातून सदस्य निवडले जातात.
 • 1/6 सदस्य राज्यपाल नियुक्त असतात. यात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक अशा विविध क्षेत्रातील तज्ञ सदस्य असतात.
 • या रचनेनुसार महाराष्ट्र विधान परिषदेतील 30 सदस्य हे विधानसभेचे सदस्य म्हणजेच आमदारांकडून निवडले जातात.
 • तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांकडून 22 सदस्य निवडले जातात.
 • शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून प्रत्येकी 7-7 सदस्य निवडले जातात.
 • तर उर्वरित 12 सदस्य हे राज्यपाल नियुक्त आहेत. सध्या या 12 ही जागा रिक्त आहेत.

विधान परिषद सदस्यत्वासाठी पात्रता

1. तो भारताचा नागरिक असावा

Advertisement

2. त्याने वयाची 30 वर्षे पूर्ण केलेली असावी

3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटींची पूर्तता त्याने करावी

Advertisement

कार्यकाळ

विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो

Advertisement

विधान परिषदेचा कार्यकाळ

विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे. ते कधीही विसर्जित होत नाही. दर दोन वर्षांनी सभागृहाचे 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच नव्याने निवडून जातात.

Advertisement

अधिवेशन

विधान परिषदेच्या दोन अधिवेशनांत सहा महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे.

Advertisement

6 राज्यांतच विधान परिषद

देशातील केवळ महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा या सहा राज्यांतच विधान परिषद आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement