शिंदे पळसे परिसरात 6 दुकानांचे शटर वाकवून चोरी: पहाटेच्या सुमारास युनियन बँक फोडण्याचा प्रयत्न असफल


नाशिकएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारीसह आता नागरिकांना चोरीच्या घटनांनी हैराण केले आहे. शिंदे पळसे गावांच्या दरम्यान बुधवारी 3 ते 4 या पहाटेच्या सुमारास तीन चे चार अज्ञात चोरट्यांनी पाच दुकानांचे शटर वाकवून तर एका बंद घराची कडी कोयंडा तोडुन घरफोडी केली. यामध्ये सुमारे पाच ते सहा लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Advertisement

नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे व पळसे या गावांच्या दरम्यान बुधवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शिवाजी उद्यान परिसर आणि बंगाली बाबा येथील माऊली पार्क येथे भास्कर शिंदे यांच्या दुकानाचे शटर तोडून प्रवेश केला, यामध्ये दुकानातील पाच हजार रुपयांसह तीन ते चार तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरीस गेले. बंगाली बाबा येथील माऊली पार्क मधील कृष्णा पाटील यांच्या बंद प्लँटमध्ये चोरी करुन या ठिकाणी तीन ते चार तोळ्याचे सोन्याचे दागिने व दहा हजार रुपयांची चोरी केली.

मधु पगार यांच्या इच्छामणी किराणा, अरुण गायधनी यांच्या नवरंग किराणा,तर शशी गायखे यांचे एल आय सी चे ऑफीस फोडून तेथील प्रत्येकी सुमारे पाच ते सहा हजाराची रोकड लाबंविले असल्याचे पळसे येथील पोलीस पाटील सुनिल गायधनी यांनी सांगितले.यावेळी चोरट्यांनी यूनियन बँकेच्या दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केला परंतु तो असफल ठरला.

Advertisement

चोरट्यांनी शटर वाकविलेच्या चित्रिकरण सीसीटिव्ही कँमेऱ्यात कैद झाले असुन यावेळी तीन चोरटे चोरी करतांना दिसुन येत आहे. या भास्कर शिंदे यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस पाटील सुनिल गायधनी यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात माहिती कळविली असता नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरिक्षक राम शिंदे यांनी पंचनामा केला आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement