शिंदे गटाची सभा: आम्ही खोके वाटून उद्धव ठाकरेंची उंची वाढवली, त्यांनी मला धोका दिला, मी काय घोडे मारले सांगा! – रामदास कदम


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Ramdas Kadam On Uddhav Thackeray |  Eknath Shinde Vs Thackeray Group | Yogesh Kadam | Maharashtra Politics Update | Khed Ratnagiri News

रत्नागिरीएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

”उद्धव ठाकरेंनी मला धोका दिला. गाफिल ठेवले. एका नेत्याच्या खांद्यावर बंदुक ठेवून उद्धव ठाकरेंनी माझ्या मुलाला पाडण्याचा प्रयत्न केला. मी तुमचे काय घोडे मारले ते सांगा. उद्धव ठाकरे कटात नव्हते पण गटात होते. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी केली असा घणाघात शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला. ते खेडमध्ये आयोजित सभेत बोलत होते.

Advertisement

उद्धव ठाकरे सभा बघताय का?

रामदास कदम म्हणाले, होय बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला पण बाळासाहेब असेही म्हटले होते की, मला काॅंग्रेस, सोनिया गांधींसोबत जायची वेळ येईल तेव्हा मी शिवसेना नावाचे दुकान बंद करून टाकेल हे म्हटले होते. उद्धव ठाकरे तुम्ही सभा लाईव्ह बघत असाल तेव्हा तुम्हाला माझा सवाल आहे. भास्कर जाधवांनी बघावे किती गर्दी जमली ते. शिवाजी पार्कही कमी पडले असते.

Advertisement

बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी केली

रामदास कदम म्हणाले, शिवसेना मोठी कुणाची हे दसऱ्याच्या सभेलाच शिक्कामोर्तब झाले. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बेईमानी केली. एक गोष्ट सांगा. 2009 ला मी दापोलीसाठी तिकीट मागितले मला गुवाघरचे तिकीट दिले. तुम्ही मला पाडण्याचा प्रयत्न करीत होते.

Advertisement

ठाकरेंचे मी काय घोडे मारले?

रामदास कदम म्हणाले, उद्धव ठाकरेंनी मला धोका दिला. गाफिल ठेवले. त्याच नेत्याच्या खांद्यावर बंदुक देऊन उद्धव ठाकरेंनी माझा मुलाला पाडण्याचा प्रयत्न केला. मी तुमचे काय घोडे मारले ते सांगा. गुन्हे आम्ही अंगावर घेतले. नारायण राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा मी वर्षभर तुमच्यासोबत गाडीत सोबत समोर बसत राहीलो. मला नांदेड, छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री केले का?

Advertisement

ठाकरे कटात नाही पण गटात होते

रामदास कदम म्हणाले, एपी गद्दार. उद्धव ठाकरेंचा कलेक्टर एपी राष्ट्रीय उत्सवावेळी यायचा. तुम्ही कटात नव्हता पण गटात नव्हता. उद्धव ठाकरे योगेश कदमला पाडण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यात सुभाष देसाईंनी बाकी काम केले. बाळासाहेब ठाकरे वाघांना सांभाळायचे. तुम्ही सुभाष देसाईंसारख्या शेळ्या – मेंढ्यांना पाळत आहात.

Advertisement

आता लाज वाटत नाही

रामदास कदम म्हणाले, गुलाबराव पाटील उद्धव ठाकरेंकडे वीस जणांना घेऊन गेले पण त्यांनी आलेल्यांना हाकलून दिले आणि आता खोके बोलायला लाज वाटत नाही. कुठे तरी लाज बाळगावी. नव्वद साली माझ्याविरोधात उमेदवार होता त्याला दाऊदची साथ होती पण मी डगमगलो नाही.

Advertisement

फौज घेवून येण्याची हिंमत होणार नाही

रामदास कदम म्हणाले, अख्खा महाराष्ट्र घेऊन माझ्या मतदारसंघात तुम्ही आले अफजलखानासारखी फौज घेवून तुमची पुन्हा येण्याची हिंमत होणार नाही. आम्ही तुम्हाला खोके दिले ते तर द्यायचे होते ना..

Advertisement

खोके वाढवून तुमची उंची वाढवली

रामदास कदम म्हणाले, मिठाईचे खोके मी उद्धव ठाकरेंना दिले एकनाथ शिंदेंनीही ठाकरेंना दिले. लाज वाटायला हवी, कुणाची हाॅटेल्स सिंगापूर, लंडन, श्रीलंकेला आहेत, कुणाच्या प्राॅपर्ट्या कुठे आहेत हे मी दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. खोके वाटून तुमची उंची मराठवाड्यात आम्ही वाढवली. मरेपर्यंत डाग लागू देणार नाही. खेडमध्ये हिंदू-मुस्लीमांना एकत्र आणायचे काम मी केले.

Advertisement

उद्धव ठाकरेंना ताकद दाखवा

रामदास कदम म्हणाले, मातोश्रीत एवढे खोके आम्ही पोहचवले. एकदा बाहेर जा आणि दहा किमी अंतरात पब्लिक जाम कसा झाला हे पाहावे. उद्धव ठाकरेंना कळवा की, माझी ताकद काय ते.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement