नाशिक7 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
समाज कल्याण विभागाच्या नशिक येथील शासकिय वसतिगृहातील विद्यार्थी ईश्वर रविंद्र झोटिंग याने सुर्वण कामगिरी केली आहे. नुकतेच पुणे येथे आयोजित महाराष्ट्र स्टेट ऑलंपिक गेम्स विशेष प्राविण्य मिळवत सुवर्णपदक पटकावले आहे. त्याच्या या कामगिरीबदल सर्वत्र कौतुक होत आहे.
कसबे वणी ता दिडोरी जिल्हा नाशिक येथील रहिवासी असलेला ईश्वर झोटींग हा सध्या नाशिक येथील के.टी.एच.एम महाविदयालयात शिक्षण घेत असुन त्याच्या शिक्षणाला समाज कल्याण विभागाच्या शासकिय वसतिगृहाचा हातभार लागत आहे.
ईश्वर झोटींग चे वडील रविंद्र झोटींग हे वाहन चालक असुन त्यांची घरची परिस्थिती नाजुक आहे. त्यामुळे त्याने उच्च शिक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, आडगांव, नाशिक येथे प्रवेश घेतला आहे. वस्तिगृहात राहुन शिक्षण घेण्याबरोबरच ईश्वर याने आपल्या रोईंग खेळात लक्ष केंद्रित करुन चमकदार कामगिरी केली आहे.
महाराष्ट्र स्टेट ऑलंपिक गेम्स (रोईंग स्पर्धा) सदर स्पर्धा दिनांक 06/01/2023 ते 09/01/2023 या कालावधीत पुणे येथे एम.आय.टी कॉलेज मध्ये संपन्न झाल्या. सदर स्पर्धेत चार जणांच्या संघात (मेन्स कॉटरपुल फोर) ईश्वर झोटींग याने विशेष प्राविण्य मिळवत सुवर्ण पदक पटकावले आहे.तसेच दुसऱ्या दुहेरी रोईंग स्पर्धेत (लाईट्स वेट मेंस डब्बल स्कल) ईश्वर झोंटीग याने सिल्वर पदक पटकावले आहे.
एकाच स्पर्धत सुवर्ण व सिल्वर पदक पटावत त्याने नवा विक्रम केला आहे. त्याच्या यशामुळे शासकिय वसतिगृहाचे नाव उंचविले आहे.त्याच्या यशात त्याचे कोच निलेश धोंडगे, नाशिक व बोट कल्बचे मुख्य गांगुर्डे सर व तसेच ऑलंपिक चॅम्पियन, दत्तु भोकनळ यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. यापुर्वी देखील ईश्वर याने चंदीगढ येथे इनडोर नॅशनल रोईंग स्पर्धेत सहभाग घेवुन 5 वा क्रमांक पटकवला होता. त्याच्या ह्या सुर्वण यशाबद्दल के.टी.एच.एम महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.बी.गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, सहाय्यक आयुक्त, सुंदरसिंग वसावे, विशेष अधिकारी हर्षदा बडगुजर, समाज कल्याण अधिकारी, देविदास कोकाटे, यांनी अभिनंदन केले आहे तर त्याच्या यशाबद्दल वसतिगृहाचे गृहपाल व्ही.बी. चव्हाण, बी.एन. पाटील, मदन बडे तसेच वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी नुकताच वसतिगृहात त्याचा सत्कार केला आहे.