शह काटशह: प्रभारी शहराध्यक्ष आकाश छाजेडांना डावलत माजी मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काॅंग्रेसचे ‘हाथ से हाथ जाेडाे’


नाशिक3 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

सात वर्षानंतर काॅंग्रेसने प्रभारी शहराध्यक्ष म्हणून नियुक्त केलेल्या आकाश छाजेड यांच्याविराेधात पक्षातंर्गत दुसऱ्या गटाची माेहीम सुरूच असून त्यांना डावलून माजी मंत्री डाॅ. शाेभा बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि.१७) पंचवटी ब्लॉक व नाशिक पूर्व विधानसभा युवक कॉँग्रेसतर्फे ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान राबविण्यात आले.

Advertisement

गेल्या दहा ते बारा वर्षापासून शहर काॅंग्रेसची गटबाजी काही केल्या थांबण्याची चिन्हे आहे. यापुर्वी शहराध्यक्षपदी आकाश छाजेड असतानाही त्यांच्याविराेधात माेठा गट हाेता. छाजेड घराणेशाहीविराेधात एका माेठ्या गटाचा आक्षेप असल्यामुळे त्यांच्याकडील जबाबदारी काढून शरद आहेर यांच्याकडे शहराध्यक्षपदाचा प्रभार दिला. हा प्रभार तब्बल सात वर्षानंतर पुन्हा छाजेड यांच्याकडे दिला गेला.

वास्तविक, शहरात काॅंग्रेसचे ग्राऊंड कनेक्ट असलेले अनेक पदाधिकारी असताना पुन्हा छाजेड यांनाच संधी का असा प्रश्न उपस्थित झाला हाेता. दरम्यान, या नियुक्तीविराेधात काॅंग्रेसमधील असंताेष कायम आहे. त्याचाच एक भाग म्हणून २६ जानेवारीपासून देशभरात सुरू झालेल्या ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान शुक्रवारी काँग्रेसच्या पंचवटी ब्लॉक व नाशिकपूर्व विधानसभा युवक काँग्रेसंतर्नत पंचवटी परिसरात राबविण्यात आले.

Advertisement

पंचवटी कारंजा येथून या अभियानाची सुरूवात करण्यात आली. सुकेणकर लेन, काळाराम मंदिर परिसर, राजवाडा, निमाणी, या परिसरात छाजेड वगळता कॉँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पत्रके वाटत नागरिकांना हात जोडून विनंती केली. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस डॉ. शोभा बच्छाव, वत्सला खैरे, ज्येष्ठ नेते राजेंद्र बागुल, सुरेश मारू, कल्पना पांडे, मध्य ब्लॉकचे अध्यक्ष बबलू खैरे, भटक्या जाती जमातीचे अध्यक्ष शरद बोडके, लक्ष्मण धोत्रे, पंचवटी ब्लॉक अध्यक्ष उद्धव पवार, पूर्व विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोहन कातकडे, यांच्यासह माेठ्या संख्येने कार्यकर्त व पदाधिकारी उपस्थित हाेते.

सलग तिसऱ्या कार्यक्रमात गटबाजीचे दर्शन

Advertisement

छाजेड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काॅग्रेसमधील डाॅ बच्छावांसह माेठा गट अनुपस्थित हाेता. त्यानंतर कसब्यामध्ये काॅंग्रेस उमेदवाराचा विजय झाल्यानंतर महाविकास आघाडीने एकत्रित जल्लाेष करण्यासाठी काॅग्रेस कमिटीसमाेर तिन्ही पदाधिकाऱ्यांना एकत्रित केले हाेते. यावेळी हाकेच्या अंतरावर असलेल्या रेडक्राॅस भागात काॅंग्रेसच्या दुसऱ्या गटाने पेढेवाटप करीत जल्लाेष केला हाेता. आता, सलग तिसऱ्या कार्यक्रमात छाजेड विराेधात दंड थाेपाटण्यात आले.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement