शहराला छावणीचे स्वरूप: शेवगावमध्ये तणावपूर्ण शांतता,‎ दंगलीत 112 आरोपी निष्पन्न‎; मास्टरमाईंडचा शोध घेणार- पालकमंत्री विखे


प्रतिनिधी | शेवगाव‎काही सेकंदांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

दंगलीच्या पार्श्वभूमीवर शेवगाव शहरात पाहणी करताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे

छत्रपती संभाजी महाराज यांच्या ‎जयंतीनिमित्त रविवारी (ता. १४)‎ निघालेल्या मिरवणुकीदरम्यान दोन‎ गटांत राडा झाला. त्यामुळे शहरात‎ मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. त्यात ‎ ‎ अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले.‎ तसेच तीन पोलिस व गृहरक्षक दलाचे‎ चार कर्मचारी जखमी झाले आहेत. ‎ पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण‎ मिळवले असले, तरी शहरात तणावपूर्ण ‎ ‎ शांतता होती. याप्रकरणी शेवगाव‎ पोलिसांनी ११२ जणांवर गुन्हे दाखल‎ केले असून, २९ जणांना अटक केली‎ आहे.‎

Advertisement

दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ‎ सोमवारी (ता. १५) तालुक्यात‎ ठिकठिकाणी कडकडीत ‘बंद’‎ पाळण्यात आला. पालकमंत्री राधाकृष्ण‎ विखे यांनी शहरात फिरुन आढावा‎ घेतला. जिल्हाधिकारी सिद्धाराम‎ सालीमठ, पोलिस अधीक्षक राकेश‎ ओला, आमदार मोनिका राजळे,‎ भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यावेळी‎ उपस्थित होते. अतिरिक्त पोलिस‎ अधीक्षक स्वाती भोर, प्रशांत खैरे,‎ उपविभागीय अधिकारी संदीप मिटके,‎ अजित पाटील हे शेवगाव शहरात तळ‎ ठोकून होते. याप्रकरणी पोलिस कर्मचारी ‎ महेश सावंत यांनी फिर्याद दिली.‎

Advertisement

पोलिसांनी १०० ते १५० अनोळखींविरुद्ध‎ गुन्हे दाखल केले. सीसीटीव्ही फुटेजच्या ‎आधारे ११२ आरोपी निष्पन्न झाले‎ असून, त्यापैकी ३२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील दोघे अल्पवयीन ‎असल्याने, त्यांना सोडुन देण्यात आले.‎ या घटनेत पोकॉ महेश लक्ष्मण सावंत, ‎ पांडुरंग वीर, रामेश्वर वसंत घुगे,‎ होमगार्ड गणेश नवनाथ कराळे, सतीश‎ विष्णू तांदळे, मयुर विश्वासराव म्हस्के,‎ आरीफ बहादूरखान पठाण हे पोलिस‎ कर्मचारी जखमी झाले.‎

अटक केलेले आरोपी पुढीलप्रमाणे :‎ इमरान दिलावर पठाण, इसान मुस्तफा‎ पठाण, बंडू मधुकर वाबळे, राहुल‎ नवनाथ कुसळकर, मुस्तफा मन्सुर खान‎ पठाण, इस्तीयाज ईस्माईल शेख, नईम‎ इलीयास सय्यद, अमर मुस्तफा शेख,‎ सल्लाउद्दीन हशमोद्दीन शेख, रिजवान‎ आयुब शेख, वसिम अल्ताफ शेख,‎ सोमनाथ सतीश मोहिते, यासीर इस्माईल‎ शेख, मतीन युसुफ शेख, शब्बीर युसुफ‎ जहागिरदार, जावेद चाँद शेख, अर्शद‎ अहमद शेख, बापूसाहेब चंद्रकांत वाघ,‎ बाबासाहेब दादू वाघमारे, प्यारेलाल‎ दस्तगीर शेख, सलीम फैय्याज शेख,‎ फिरदोस फारूक पठाण, शमशोटीन‎ कदीर सय्यद, नदीन जाफर शेख,‎ रज्जाक कदीर सय्यद, हुसेन रहीम बेग,‎ रोहित अशोक सुमारे, कैलास भाऊराव‎ तिजोरे, अरिज नजीर पठाण.‎

Advertisement

मास्टर माईंडचा शोध घेणार‎

समाजकंटकाच्या दहशतीला न घाबरता,‎ व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करावीत.‎ शेवगावच्या इतिहासात झाली नसेल,‎ अशी कठोर कारवाई दंगलीत सहभागी‎ असणाऱ्या, तसेच गुंडावर करण्यात‎ येईल. त्यांच्यामागे कोण मास्टरमाइंड‎ आहे, याचा शोध घेणार असल्याची‎ माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी‎ दिली.‎

Advertisement

पोलिस बंदोबस्तामुळे शेवगाव शहराला छावणीचे स्वरूप‎

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी शहराला भेट दिली.‎ अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय‎ पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्यासह तीन आरसीबी, तीन एसआरपी तुकड्या, १२‎ पोलिस निरीक्षक, २० सहाय्यक पोलिस निरीक्षकांसह २०० पोलिसांचा बंदोबस्त प्रमुख‎ ठिकाणी तैनात केला आहे. सीसीटीव्ही व व्हिडीओ रेकाॅर्डिंग पाहून पोलिस आरोपींची‎ खातजमा करीत आहेत.‎

Advertisement



Source link

Advertisement