शहराची कचरा कुंडी करणाऱ्यावर आता 103 कॅमेऱ्याची नजर: नाशिक शहरात 15 हजारापर्यंतच्या दंडासोबत प्रसंगी फौजदारी कारवाई


नाशिक7 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

स्वच्छ व सुंदर शहर असा अनेक वर्षापासून नारा देत कोट्यावधी रुपये खर्च करूनही केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर स्पर्धेमध्ये नाशिक देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये येत नसल्यामुळे आता महापालिकेने शहरांमधील काही विभागांमध्ये 102 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवून घंटागाडीचा पर्याय सोडून उड्यावर कचरा टाकणाऱ्या विरोधामध्ये कारवाईसाठी कंबर कसली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाने 102 ब्लॅक स्पॉट निश्चित केले असून या ठिकाणी कॅमेरे बसवण्यासंदर्भातील प्रस्ताव स्मार्ट सिटीला पाठवला आहे. कचरा टाकणाऱ्या 300 रुपयांपासून तर 15 हजार रुपयांपर्यंत दंड केला जाणारा असून प्रसंगी फौजदारी कारवाई देखील होऊ शकते.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या स्वच्छ शहर स्पर्धत नाशिकची कामगिरी सुमार राहीली आहे. 2019 मध्ये दहा लाख लोकसंख्या असलेल्या देशभरातील पाचशे शहरांमध्ये नाशिक शहराचा 67 वा क्रमांक लागला होता. त्यानंतर पालिकेने जाेरदार तयारी केल्यानंतर 2020 मध्ये नाशिकने 67 व्या क्रमांकावरून थेट 11 व्या क्रमांकावर झेप घेतली. मात्र 2021 मध्ये मात्र पालिकेची घसरगुंडी उडून 17 व्या क्रमांकावर नाशिक आले. 2022 मध्ये नाशिकचा क्रमांक थेट 20 वर गेल्यामुळे आता त्यामागची कारणे शोधून उपाययोजना केल्या जात आहेत. शहरातील कचरा उचलण्यासाठी पाच वर्षाकरिता साडेतीनशे कोटी रुपये अधिक खर्च करून घंटागाडी योजना चालवली जात आहे. घंटागाडीवर कोट्यवधी खर्च होवूनही ब्लॅक स्पॉट शिल्लक राहत असल्याने आता कचºयाच्या ब्लॅक स्पॉटचा शोध घेवून नष्ट करणे तसेच नवीन ब्लॅक स्पॉट निर्माण होणार नाहीत याचे नियोजन सुरू झाले आहे. पालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शहरातील रस्ते ,चौक साफसफाई नंतर कचऱ्याच्या ब्लॅक स्पॉवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. शहरातील कचऱ्याचे १०२ ब्लॅक स्पॉट पूर्णपणे काढून टाकण्याचे निर्देश त्यांनी घनकचरा विभाग आणि विभागीय अधिकाऱ्यांना दिले होते. वारंवार सूचना देऊन तसेच कठोर कारवाई केल्यानंतरही शहरातील शंभरहून अधिक ठिकाणांवर कचरा टाकला जात होता. कचरा टाकणारे विरोधामध्ये कारवाई करण्यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेत थेट सीसीटिव्हीची नजर ठेवली जाणार आहे.संबधितांचा कचरा टाकण्याचा फोटो सार्वजनिक करण्यासह त्यावर दंडात्मक कारवाई देखील केली जाणार आहे.

नदी प्रदूषित करणारे रडारवर

Advertisement

प्रामुख्याने नासाडी नदीसह वाघाडी व अन्य नदी परिसरामध्ये २६ कॅमेरे बसवले जाणार आहे जेणेकरून नदी प्रदूषण करणाऱ्यांना चाप बसणार आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement