शरद पवारांवरील टीकेवर दिलीप वळसे पाटील यांचा यू टर्न: म्हणाले, मी तर खंत व्यक्त करत होतो, माध्यमांनी चुकीचा अर्थ काढला

शरद पवारांवरील टीकेवर दिलीप वळसे पाटील यांचा यू टर्न: म्हणाले, मी तर खंत व्यक्त करत होतो, माध्यमांनी चुकीचा अर्थ काढला


मुंबई11 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

शरद पवारांवरील माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. मी तर महाराष्ट्रातील जनतेने शरद पवारांना एकहाती सत्ता दिली नाही, अशी खंत व्यक्त करत होतो, अशी सारवासारव आता दिलीप वळसे-पाटील यांनी केली आहे.

Advertisement

एकेकाळच्या निष्ठावंताची बोचरी टीका

रविवारी एका जाहीर कार्यक्रमात दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांवर बोचरी टीका केली होती. ‘शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशामध्ये नाही असे आपण म्हणतो परंतु महाराष्ट्रातील जनतेने शरद पवार यांना एकदाही बहुमत दिले नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आले नाही’, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर चांगलाच गदारोळ उडाला. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

Advertisement

वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला

एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, माझ्या वाक्याचा अर्थ मीडियाने चुकीचा लावलेला दिसतो आहे. माझे संपूर्ण भाषण ऐकले तर लक्षात येईल की मी शरद पवारांविषयी असे बोललेलो नाही. माझे असे म्हणणे होते की, 40 ते 50 वर्षे शरद पवारांनी या राज्यासाठी, देशासाठी काम केले. देशात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. त्यातले अनेक पक्ष स्वतःच्या हिंमतीवर बहुमत मिळवून सत्तेवर बसले आहेत. मात्र महाराष्ट्रातल्या जनतेने अशी शक्ती शरद पवार यांच्या मागे उभी केली नाही, याची मला खंत आहे. मी खंत व्यक्त करत होतो

Advertisement

आमचे नेते आजही शरद पवारच

दिलीप वळसे पाटील म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेने शरद पवारांच्या पाठीमागे अशी शक्ती उभी केली नाही, असे बोलून शरद पवारांना कमी लेखण्याचा किंवा काही त्यांना काही चुकीचे बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शरद पवार हे आमचे कालही नेते होते, आजही आहेत व उद्याही राहतील. ते माझ्यासाठी कायम गुरूस्थानी राहतील.

Advertisement

रोहित पवारांचेही प्रत्युत्तर

दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांवर बोचरी टीका केल्यानंतर आमदार रोहीत पवार यांनीही दिलीप वळसे पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. रोहित पवार म्हणाले, मला आश्चर्य वाटते. पूर्वी शरद पवारांच्या आसपास जे लोक होते त्यांनी ज्या पद्धतीने जबाबदारी पार पाडायला हवी होती, ती त्यांनी पार पाडली नसावी, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्णपणे बहुमत मिळाले नाही.

Advertisement

संबंधित वृत्त

दिलीप वळसे-पाटील यांचा हल्लाबोल:महाराष्ट्राने एकदाही बहुमत देऊन शरद पवारांना मुख्यमंत्री केले नाही; आव्हाडांचेही प्रत्युत्तर

Advertisement

अजित पवार गटासोबत सत्तेत सहभागी झालेले दिलीप वळसे-पाटील यांनी प्रथमच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांवर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशामध्ये नाही असे आपण म्हणतो परंतु महाराष्ट्रातील जनतेने शरद पवार यांना एकदाही बहुमत दिले नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आले नाही, अशी घणाघाती टीका दिलीप वळसे-पाटील यांनी केली आहे. वाचा सविस्तरSource link

Advertisement