राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरने शनिवारी आयपीएल २०२२ च्या नवव्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध शानदार १०० धावा केल्या. या खेळीत त्याने ६८ चेंडूत ११ चौकार आणि पाच षटकार मारले. या मोसमात शतक झळकावणारा बटलर पहिला फलंदाज ठरला आहे. मात्र, शतक झळकावल्यानंतर बटलरला पाहिजे तसा मान मिळाला नाही.
बटलर आणि मुंबई इंडियन्सचा इशान किशन यांच्यात १३५-१३५ धावा समान आहेत, पण सध्या ऑरेंज कॅप इशानकडे आहे. दोन्ही फलंदाजांनी प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत. ईशानची सरासरी आणि स्ट्राईक रेट बटलरपेक्षा जास्त असला तरी, त्यामुळे त्याच्याकडे सध्या ऑरेंज कॅप आहे.
खेळाडू | सामना | धावा | सर्वश्रेष्ठ स्कोर | सरासरी | स्ट्राइक रेट | 100 | 50 |
ईशान किशन | 2 | 135 | 81* | 135.00. | 148.87 | 0 | 2 |
जॉस बटलर | 2 | 135 | 100 | 67.50 | 140.62 | 1 | 0 |
आंद्रे रसेल | 3 | 95 | 70* | 95.00 | 193.87 | 0 | 1 |
फॉफ डु प्लेसी | 2 | 93 | 88 | 46.50. | 152.45 | 0 | 1 |
संजू सैमसन | 2 | 85 | 55 | 42.50 | 177.08 | 0 | 1 |
इशान किशनने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शानदार नाबाद अर्धशतकी खेळी केली होती. त्याने पहिल्या दोन सामन्यांमध्ये दोन अर्धशकते फटकावली आहेत. दुसरीकडे जोस बटलरने मुंबईविरुद्ध तुफानी अर्धशतकी खेळी केली होती. आयपीएलच्या या हंगामातील पहिला शतकवीर होण्याचा मान जोस बटलरने पटकावला आहे. दरम्यान, इशान किशनने दोन सामन्यात एकदा नाबाद राहत १३५ धावा काढल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १४८.३५ एवढा राहिला आहे. तर जोस बटलरने दोन डावांत १३५ धावा केल्या असून, त्याची सरासरी ही ६७.५ आहे. तर बटलरचा स्ट्राईक रेट हा १४०.६२ आहे. ऑरेंज कॅपच्या यादीत आंद्रे रसेल ९५ धावांसह तिसऱ्या स्थानावर तर फाफ डू प्लेसी ९३ धावांसह चौथ्या स्थानावर आहे. संजू सॅमसन ८५ धावांसह पाचव्या स्थानावर आहे.
बटलर सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्याशिवाय शेवटच्या सामन्यात स्फोटक खेळी खेळणाऱ्या आंद्रे रसेलची राजवट २४ तासही टिकू शकली नाही आणि इशान किशनने त्याच्याकडून ऑरेंज कॅप हिसकावून घेतली. रसेल आता तीन सामन्यांत ९५ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिस दोन सामन्यांत ९३ धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्याशिवाय राजस्थान रॉयल्सचा कर्णधार सॅनसू सॅमसन दोन सामन्यांत ८५ धावांसह टॉप-५ मध्ये कायम आहे.
पर्पल कॅपच्या यादीत उमेश यादवने ३ सामन्यांत ८ बळी टिपत पर्पल कॅप आपल्याकडे ठेवली आहे. या यादीत युझवेंद्र चहल ५ विकेट्सह दुसऱ्या स्थानावर आहे. तर मोहम्मद शमी, टीम साउदी आणि वनिंदू हसरंगा हे प्रत्येकी ५ विकेट्सह अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत.