शक्ती मिल गँगरेप केस: शक्ती मिल सामूहिक बलात्कारातील दोषींना आता फाशी नाही जन्मठेप होणार! तिन्ही आरोपींची शिक्षा कमी करण्यास हायकोर्टाची मंजुरी


Advertisement

मुंबईएका तासापूर्वी

  • कॉपी लिंक

शक्ती मिल येथे झालेल्या सामूहिक बलात्कारातील दोषींची शिक्षा कमी करण्याचा निकाल आज मुंबई उच्च न्यायालयाने जारी केले आहे. 2014 मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने तीन आरोपी विजय जाधव, कासिम बंगाली आणि सलीम अंसारी या तिघांना मृत्यूदंड सुनावला होता. यानंतर आरोपींनी हायकोर्टात याचिका दाखल करून शिक्षा कमी करण्याची विनंती केली होती.

Advertisement

मुंबई हायकोर्टात व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्यमातून सर्व आरोपींना हजर करण्यात आले. यानंतर जस्टिस एसएस जाधव आणि जस्टिस पृथ्वीराज चव्हाण यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने त्यांना सुनावलेली मृत्यूदंडाची शिक्षा जन्मठेपेत बदलण्याचे आदेश जारी केले.

शक्ती मिल बलात्काराची दोन प्रकरणे शक्ती मिल बलात्काराची दोन प्रकरणे समोर आली होती. त्यातील एका प्रकरणात महिला फोटो जर्नलिस्ट तर दुसऱ्या प्रकरणात एका कॉल सेंटरच्या महिला ऑपरेटरवर बलात्कार करण्यात आला होता. फोटो जर्नलिस्ट प्रकरणात एकूण 5 आरोपी होते. त्यातील एक अल्पवयीन होता. तर कॉल सेंटरच्या महिला कर्मचाऱ्यावर बलात्काराच्या घटनेत सुद्धा एका अल्पवयीनासह एकूण 5 आरोपी होते. या दोन प्रकरणांतील 5 पैकी 3 दोषी दोन्ही प्रकरणांमध्ये दोषी आहेत.

Advertisement

कधी काय घडले?
22 ऑगस्ट 2013 रोजी एका नियकालिकेसाठी फोटो जर्नलिस्ट म्हणून काम करणाऱ्या महिलेवर महालक्ष्मी येथील शक्ती मिलमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणात दुसऱ्याच दिवशी पहिल्या आरोपीला अटक करण्यात आली. त्यावेळी आरोपी अल्पवयीन होता. 24 ऑगस्ट 2013 रोजी दुसरा आरोपी विजय जाधव याला बेड्या ठोकण्यात आल्या. त्याच दिवशी तिसरा आरोपी सिराज रहमान याला देखील अटक झाली. 25 ऑगस्ट रोजी चौथ्या आरोपीला पकडण्यात आले. त्याचे नाव कासिम बंगाली असे होते. तर 25 ऑगस्ट रोजीच शेवटचा आणि मुख्य आरोपी मोहंमद सलीम अंसारी याला अटक झाली. पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर 26 ऑगस्ट 2013 रोजी पीडित फोटो जर्नलिस्टचा जबाब नोंदवला.

यानंतर 3 सप्टेंबर 2013 रोजी आणखी एका महिलेने पुढे येऊन आपल्यावर त्याच ठिकाणी झालेल्या अत्याचाराची आपबिती सांगितली. कॉल सेंटरवर काम करणाऱ्या या महिलेने सांगितल्याप्रमाणे, तिच्यावर 31 जुलै 2013 रोजी सामूहिक अत्याचार झाला होता. फोटो जर्नलिस्ट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींनीच तिच्यावर बलात्कार केला होता.

Advertisement

20 मार्च 2014 रोजी मुंबई सत्र न्यायालयाने 4 जणांना दोषी ठरवले. यातील 3 आरोपींना पुन्हा-पुन्हा बलात्कार केल्या प्रकरणी मृत्यूदंड सुनावला. तर उर्वरीत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता हायकोर्टाच्या आदेशाने सर्वच आरोपींना जन्मठेप देण्यात आली आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here