व्हॅक्सिन: कोरोनाच्या गंभीर लक्षणांपासून वाचवण्यासाठी कोव्हॅक्सिनचे दोन डोस 50% पर्यंत प्रभावी


Advertisement

नवी दिल्ली26 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

कोव्हॅक्सिनचे दोन डोस गंभीर लक्षणे असलेल्या कोरोनापासून वाचवण्यासाठी ५०% प्रभावी आहेत. भारत बायोटेकद्वारे विकसित या लसीच्या कार्यक्षमतेच्या पहिल्या रिअल-वर्ल्ड अभ्यासाचे परिणाम अलीकडेच लॅन्सेट या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत. हा निष्कर्ष देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पीकदरम्यान (१५ एप्रिल ते १५ मेदरम्यान) दिल्ली एम्समध्ये कार्यरत २,७१४ आरोग्य कर्मचाऱ्यांवरील अभ्यासाच्या आधारावर काढण्यात आला आहे.

Advertisement

अभ्यासात सहभागी दिल्ली एम्समधील मेडिसिनचे प्रा. डॉ. मनीष सोनेजा यांच्यानुसार, अभ्यासासाठी निवड झालेल्या सर्व २,७१४ आरोग्य कर्मचाऱ्यांत कोरोनाची लक्षणे होती. सर्वांची आरटीपीसीआर करण्यात आली. तीत १,६१७ आरोग्य कर्मचारी संक्रमित आढळले. देशात लसीकरण मोहिमेत आरोग्य कर्मचाऱ्यांनाच सर्वात आधी लस देण्यात आली होती. चाचणीत सहभागी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोव्हॅक्सिनचे दोन डोस आरटीपीसीआर चाचणीच्या किमान १४ दिवस आधी देण्यात आले होते. पहिल्या चाचणीनंतर ७ दिवसांच्या फॉलोअप कालावधीतही कोव्हॅक्सिनची प्रभावशीलता ५०%च राहिली.

आरोग्य कर्मचाऱ्यांवर चाचणीमुळे परिणामकारकता कमी
कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीच्या निकालात लस ७७.८८% प्रभावी असल्याचे आढळले होते, पण त्यांच्या शोधाचे निष्कर्ष त्यापेक्षा वेगळे आहेत हे संशोधकांनी मान्य केले. तथापि, संशोधकांच्या मते, त्याची अनेक कारणे आहेत. पहिले कारण- हा अभ्यास सामान्य जनतेवर नव्हे, तर ज्यांना संसर्गाचा धोका जास्त आहे अशा आरोग्य कर्मचाऱ्यांवर करण्यात आला. दुसरे कारण- अभ्यास कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पीकदरम्यान करण्यात आला तेव्हा टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट आधीपासूनच जास्त होता. तिसरे कारण- संशोधनादरम्यान कोरोनाच्या डेल्टासहित अनेक व्हेरिएंट्स ऑफ कन्सर्नचा फैलाव झाला होता, तो कोणत्याही लसीची प्रभावशीलता कमी करू शकतो.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here