भंडारा26 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
शक्तीवर्धक गोळ्यांच्या अतिसेवनामुळे एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना भंडाऱ्यात घडली आहे. लॉजवर मैत्रिणीसोबत रात्र घालवताना हा प्रकार घडल्याची माहिती ाहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, मृत तरुणाचे मोबाइलवरून एका तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. ते भंडाऱ्यात भेटले. रात्र घालवण्यासाठी भंडाऱ्यातील एका लॉजवर थांबले. यावेळी तरुणाने व्हायग्रा गोळ्यांचे अतिसेवन केले. त्यामुळे रक्तदाब वाढून त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
दिवसभर एकत्र फिरून खरेदी केली
वृत्तानुसार, 27 वर्षीय मृत तरुण नागपूरचा आहे. तर त्याची 23 वर्षीय मैत्रीण गोंदियाची आहे. काही महिन्यांपूर्वी या दोघांची एकेठिकाणी भेट झाली होती. या भेटीचे हळूहळू मैत्रीत व त्यानंतर प्रेमात रुपांतर झाले. हे दोघे भंडाऱ्यात दिवसभर एकत्र फिरले. खरेदी केली. तसेच रात्र एकत्र घालवण्यासाठी त्यांनी भंडारा मध्यवर्ती बसस्थानकालगत असलेल्या हिरणवार लॉजवर मुक्काम करण्याचा बेत आखला.
4 पैकी 2 गोळ्या घेतल्या अन् कोसळला
यावेळी तरुणाने मेडिकलमधून व्हायग्राच्या 100 एमजीच्या 4 गोळ्या खरेदी केल्या. त्याने त्यापैकी 2 गोळ्या घेतल्या. यामुळे त्याचा रक्तदाब अचानक वाढला. त्यातच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो कोसळला. त्याला तत्काळ लगतच्या रुग्णालयात दाखल केले असता तिथे त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
काय म्हणतो प्राथमिक तपासाचा अंदाज?
प्राथमिक तपासात तरुणाचा मृत्यू व्हायग्रा शक्तीवर्धक गोळ्यांच्या अतिसेवनामुळे झाल्याचा अंदाज आहे. पण शवविच्छेदन अहवालामुळेच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.