प्रतिनिधी l जळगावएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
दाणा नमकीनचे व्यापारी आपले दुकान बंद करून घरी जात असताना त्यांची 8 लाख रुपये रोकड असलेली बॅग दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी जबरदस्ती हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना पांडे चौकाजवळील रामदेव बाबा मंदिरासमोर घडली आहे. सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली.
सिंधी कॉलनीत राहणारे मेधानी हे दाणा बाजारात नमकिनचा व्यापार करतात. सोमवारी दुकानात आलेली ८ लाख रुपयांची रोकड घेवून ते दुचाकीने घरी निघाले होते. पांडे चौक ओलांडल्यानंतर रामदेव बाबा मंदिरा समोरून जात असताना मागून आलेल्या एका दुचाकीवरील दोन तरुणांनी त्याच्या गाडीसमोर आपली दुचाकी आडवी उभी केली व रस्ता अडवला. याच वेळी मागे बसलेल्या चोरट्याने मेधानी यांच्या जवळील कॅश, लॅपटॉप, मोबाईल असलेली बॅग जबरदस्तीने हिसकवली. मेधानी यांना याला विरोध केला मात्र काहीच उपयोग झाला नाही.
पाठलाग करूनही सापडले नाहीत चोरटे
बॅग हिसकावून भामट्यांनी शेजारील गल्लीतून नेरी नाक्याकडे धूम ठोकली. पण ते सापडले नाही. दरम्यान, या घटनेबाबत एमआयडीसी व जिल्हा पेठ पोलिसाना कळवल्यानंतर दोन्ही पोलिस घटना स्थळी पोहचले. अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी संदीप गावित हे देखील पोहचले. त्यांनी आजु बाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात भामटे बंदिस्त झाले का याचा शोध घण्याच्या सूचना दिल्या. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.