वेस्ट इंडिजचे नेतृत्व पोलार्डकडेसेंट जॉन्स (अँटिग्वा)

Advertisement

दुखापतीतून सावरलेल्या किरॉन पोलार्डकडे आर्यंलड आणि इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या आगामी मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकांसाठी वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. विंडीजचा संघ आर्यंलडशी सबिना पार्क (जमैका) येथे ८ ते १६ जानेवारी या दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि एकमेव ट्वेन्टी-२० सामना खेळेल. मग हा संघ इंग्लंडशी केन्सिंग्टन ओव्हल (बार्बाडोस) येथे २२ ते ३० जानेवारी या कालावधीत पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.

  • ट्वेन्टी-२० संघ :

किरॉन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन, फॅबियन अ‍ॅलन (फक्त इंग्लंड), डॅरेन ब्राव्हो (फक्त इंग्लंड), रोस्टन चेस, शेल्डन कॉट्रेल, डॉमिनिक ड्रेक्स, शाय होप, अकेल होसेन, जेसन होल्डर, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, रोव्हमन पॉवेल, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, हेडन वॉल्श कनिष्ठ.

Advertisement
  • एकदिवसीय संघ :

किरॉन पोलार्ड (कर्णधार), शाय होप, शामार ब्रूक्स, रोस्टन चेस, जस्टिन ग्रीव्हज, जेसन होल्डर, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोटी, जेडेन सील्स, निकोलस पूरन, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, डेव्हन थॉमस.

The post वेस्ट इंडिजचे नेतृत्व पोलार्डकडे appeared first on Loksatta.

AdvertisementSource link

Advertisement