पुणे12 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
पालखी मार्गावर नवीन रस्त्यावर पालखीपूर्वी टाेल सुरु करण्यात येऊ नये अशी वारकऱ्यांची मागणी आहे. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना याबाबत निवेदन देण्यात येणार आहे. पालखीपूर्वी जर टाेल सुरु झाला तर वारकऱ्यांना त्यातून सूट देण्यासाठी विशेष पास वितरित करण्याबाबत विनंती केली जाणार आहे. नवीन रस्त्याबाबत वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून एकमताने नितीन गडकरी यांचे अभिनंदनाचा ठराव समंत करण्यात आला आहे.
पालखी मार्ग हिरवळीने बहरणार
भूसंपादनामुळे माेठा रस्ते हाेणे अशक्य हाेते ते पूर्णत्वास गेले असून पालखी मार्गावर दहा हजार झाडे लावण्याचे नियाेजित आहे. दाेन मुक्कामामध्ये कायमस्वरुपी राहूटया निर्माण करण्याचा विषय समाेर आला असून त्यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील असल्याचे मत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बाेलताना गुरुवारी व्यक्त केले आहे.
पूर्वतयारीला वेग
चंद्रकांत पाटील म्हणाले, ज्या दाेन महत्वाच्या पालख्या देहू व आळंदीवरुन पंढरपूरकडे जातील त्या वाटेवरील अनेक गाेष्टींची बारीक बारीक पूर्वतयारी करावी लागते. प्रशासनाकडून या तयारी करण्यात येत हाेती. पुणे, साताारा, सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पालकमंत्री व प्रशासन आणि वारकरी संघटनांचे प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक दरवर्षी महिनाभर आधी घ्यावी लागते. ती बैठक चांगल्या वातावरणात आज पार पडली आहे.
दोन समित्या नियुक्त
महिनाभर प्रशासनाने त्याची पूर्वतयारी केली असून त्यात माेठया प्रमाणात स्वच्छतागृह व्यवस्था, पिण्याचे पाणी, आराेग्य काळजी याचा बाराकाईने विचार केला आहे. भविष्यातील काही महत्वाचे माेठे विषय समाेर आले असून त्यादृष्टीने दाेन समित्या नियुक्त करण्यात आले आहे. एक समिती तात्काळच्या विषयावर वारी व्यवस्थित पार पडण्यासाठी विभागीय आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली असेल. यात वारकरी प्रमुख, प्रशासकीय अधिकारी यांची बैठक हाेईल आणि त्यांची दर आठवड्याला प्रत्यक्ष बैठक अडीअडचणी साेडविण्यास पार पडेल.
देहूचे गायरान यंदा सर्वजण वापरु शकणार
वारी संपल्यानंतर ही विभागीय आयुक्तांचे अध्यक्षतेखाली दाेन ते तीन महिने बैठका घेऊन नवीन गाेष्टी येतात त्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येईल. जसे की, पालखी मार्गावर जी माेठी झाडे लावताे त्याचे नियाेजन, दाेन पालखी मुक्कमाचे अंतरावर पेंडाेल, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व्यवस्था कायमस्वरुपी करणे. रस्ते, पुल, रस्ते रुंदीकरण, मुक्कामी पालखी तळ याबाबत विषय वारीनंतर सुरु करण्यात येतील. देहूचे गायरान यंदा सर्वजण वापरु शकतील. वारकऱ्यांचा अधिकार सदर गायरानावर असून पिंपरी चिंचवड पाेलीस मुख्यालयाचा त्याजागी थाेडा विषय आहे. त्याबाबत बैठक घेऊन