नागपूर6 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
कन्हान-कांद्री क्षेत्रातील सलग्न भागात वेकोलीद्वारे टाकण्यात आलेल्या मातीमुळे कृत्रिम टेकड्या तयार झाल्या आहे. या टेकड्यांच्या आतील भागात करण्यात येणाऱ्या ब्लास्टिंगच्या हादरे येथील घरांना बसतात. अशाच ब्लास्टिंगच्या हादऱ्यामुळे घर पडून त्यात दोघे बाप लेक ठार झाल्याची घटना घडली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
हरीहर नगर कांद्री येथील कोटेकर कुटुंबावर यामुळे शोककळा पसरली आहे. सोमवारी सलून बंद असते म्हणून कांद्री येथील सलूनमध्ये न जाता कमलेश कोटेकर हा घरीच होता. केजी-2 मध्ये शिकणारी पाच वर्षाची यादवी कमलेश कोटेकर ही शाळेतून घरी आल्या नंतर बाप लेकीने जेवण केले. त्या नंतर दुपारी झोपले. लहान मुलगा आजीबरोबर घरा बाहेर खेळत होता. तर बायको शेतात कामाला गेली होती.
वेकोलीच्या स्फोटाने अगोदरच क्षतीग्रस्त झालेले घर अचानक दुपारी १ वाजताच्या सुमारास कोसळले आणि झोपेतच बाप लेकी घराखाली दबले. अचानक झालेल्या दुर्घटनेने नागरिकांनी त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली. मात्र यादवी व कमलेशला वेळेवर वाचवू शकले नाही. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
नागरिकांचे आंदोलन
घटनेची माहिती होताच लोक संतप्त झाले. माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, माजी उपसरपंच श्यामकुमार बर्वे, माजी जि. प. सदस्य योगेश वडिभसम्मे यांच्यासह शेकडाे नागरिकांनी वेकोली क्षेत्रात ठिय्या मांडून मृतकाच्या परिवाराला न्याय देण्यासाठी आंदोलन केले.
मृत चिमुकली