वीरेंद्र सेहवागने दिला ॠषभ पंत दिला सल्ला, म्हणाला आता तरी जबाबदारीने खेळ

वीरेंद्र सेहवागने दिला ॠषभ पंत दिला सल्ला, म्हणाला आता तरी जबाबदारीने खेळ
वीरेंद्र सेहवागने दिला ॠषभ पंत दिला सल्ला, म्हणाला आता तरी जबाबदारीने खेळ

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला एक सल्ला दिला आहे. वीरेंद्र सेहवाग हा भारताचा धडाकेबाज सलामीवीर होता. तो कोणतही भीड न बाळगता आक्रमक शैलीतच फलंदाजी करणे पसंत करत होता. त्याने ऋषभ पंतला मात्र जबाबदारीने खेळ करण्याचा सल्ला दिला. तो म्हणतो की ऋषभ पंतने जबाबदारीने खेळणे आणि चांगल्या स्ट्राईक रेटने धावा करणे यात योग्य समतोल साधणे गरजचे आहे.

ऋषभ पंतने यंदाच्या आयपीएल हंगामात ९ सामन्यात १४९.०४ च्या सरासरीने २३४ धावा केल्या आहेत. मात्र त्याला यंदाच्या हंगामात एकही अर्धशतक ठोकता आलेले नाही. तो तीन वेळा चाळीशीमध्ये बाद झाला आहे. आज दिल्ली सनराईजर्स हैदराबाद विरूद्ध भिडत आहे. हा सामना दिल्लीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या अनुशंगानेच वीरेंद्र सेहवागने पंतला सल्ला दिला.

Advertisement

सेहवाग म्हणाला, ‘ऋषभ पंतने आता जरा जबाबदारीने खेळ केला पाहिजे. मात्र त्यावेळी तुम्ही अशा प्रकारे फलंदाजी करता त्यावेळी तुमचा स्ट्राईक रेट खाली येतो. दुसऱ्या बाजूला ज्यावेळी तो मुक्तपणे खेळण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी तो बाद होत आहे. त्याला आता मुक्तपणे खेळत शेवटपर्यंत टिकण्यासाठी योग्य समतोल राखता आला पाहिजे. पंतने दडपणाखाली न खेळता त्याच्या त्याच्या स्टाईलनेच बॅटिंग करावी. ४० चेंडूत ४० धावा हे पंतला सूट होत नाही.’

लखनौ सुपर जायंटविरूद्धच्या सामन्यात पंतने ३० चेंडूत ४४ धावा केल्या होत्या. मात्र दिल्ली हा सामना ६ धावांनी गमावला होता. लखनौच्या १९६ धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाला १८९ धावांपर्यंच मजल मारता आली होती. केएल राहुलने त्या सामन्यात ७७ धावांची खेळी केली होती. या जोरावारच लखनौने १९५ धावांपर्यंत मजल मारली. दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत ९ सामन्यात फक्त ४ विजय मिळवले आहेत. ते सध्या गुणतालिकेत आठ गुणांसह सातव्या स्थानावर आहे. दिल्ली आज सनराईजर्स हैदराबाद विरूद्ध सामना खेळत आहे. याही सामन्यात ऋषभ पंतला मोठी खेळी करण्यात अपयश आले. तो १६ चेंडूत २६ धावा करून बाद झाला.

Advertisement