वीरेंद्र सेहवागने खास त्याच्या स्टाईलने शिवम दुबेची शाळा घेतली काय आहे ते प्रकरण वाचा…

वीरेंद्र सेहवागने खास त्याच्या स्टाईलने शिवम दुबेची शाळा घेतली काय आहे ते प्रकरण वाचा...
वीरेंद्र सेहवागने खास त्याच्या स्टाईलने शिवम दुबेची शाळा घेतली काय आहे ते प्रकरण वाचा...

इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या हंगामातील हाय स्कोअरिंग मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्जला पराभवाचा सामना करावा लागला. दोन्ही संघांनी धावांची बरसात करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झाला. सामना कधी लखनौ सुपर जाएंट्सच्या बाजूनं झुकताना दिसला तर कधी चेन्नई सुपर किंग्जनं पुन्हा कमबॅक केल्याचे पाहायला मिळाले. शेवटी बाजी मारली ती लखनौ सुपर जाएंट्सच्या संघानेच.

या सामन्याला खरी कलाटणी मिळाली ती १९ व्या षटकात. चेन्नई सुपर किंग्जनं निर्णायक ओव्हर टाकण्याची जबाबदारी ही शिवम दुबेवर सोपवली. सामन्यात पहिलेच षटक टाकताना तो दबावात दिसला. पहिल्याच चेंडूवर मारलेल्या षटकारातून तो सावरलाच नाही. आणि याच षटकात सामना लखनौच्या बाजूनं फिरला. चेन्नई सुपर किंग्ज संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २११ धावांचे आव्हान समोर ठेवले होते. ४गडी गमावत लखनौ सुपर जाएंट्सने हे लक्ष्य पार केले. या सामन्यात सर्वच गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाल्याचे पाहायला मिळाले. शिवम दुबेनं १९ व्या षटकात २५ धावा खर्च केल्या.

Advertisement

शिवम दुबेच्या धुलाईवर भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने मजेशीर ट्विट केले आहे. त्याने हॉलीवूड अभिनेता विल स्मिथने ऑस्कर पुरस्कारावेळी ख्रिस रॉकला मारलेल्या थप्पडची मीम्स शेअर केलीये. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्कर पुरस्कार समारंभात पत्नीविषयी अशोभनिय वक्तव्य केल्यामुळे होस्टला चापड लगावली होती. या मीम्सच्या माध्यमातून सेहवागने शिवम दुबेची शाळा घेतलीये. यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

Advertisement

सेहवागने ट्विटरवर हॉलिवूड अभिनेता विल स्मिथची थप्पड मारलेली मीम शेअर करताना लिहिले की, लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाने शिवम दुबेच्या ओव्हरची अशी धुलाई केली. नुकत्याच झालेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात विल स्मिथने आपल्या पत्नीवर टिप्पणी केल्याबद्दल होस्टला थप्पड मारली होती.

Advertisement