वीज जोडणीसाठीची वायर ग्राहकाला खरेदी करायला लवले: महावितरण अधिकाऱ्यांच्या संगनमताने फसवणुकीचा ग्राहकांचा आरोप

वीज जोडणीसाठीची वायर ग्राहकाला खरेदी करायला लवले: महावितरण अधिकाऱ्यांच्या संगनमताने फसवणुकीचा ग्राहकांचा आरोप


औरंगाबाद36 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

शहानुरवाडी सहकार बँक कॉलनी येथील राजेश मानकर यांना नियमबाह्यरीत्या 53 हजार 640 रुपयांची वीज जोडणीसाठीची वायर खरेदी करायला लावली. कोटेशनचे 57 हजार 742 रुपये वेगळे घेतले. जोडणी ऑक्टोबरमध्ये विलंबाने दिली. ठेकेदाराने महावितरणकडूनही वायरचे बील वसूल केले आहे. या विरोधात पन्नालालनगर महावितरण अधिकाऱ्यांनी ठेकेदारावर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांची मिलिभगत असल्याने ग्राहक राजेश यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार देऊन कारवाईची मागणी केली आहे.

Advertisement

ग्राहकांनी वीज जोडणीसाठी अर्ज केल्यानंतर महावितरणचे पथक स्थळ पाहणी करते. कागदपत्रानुसार सत्यता पडताळणी झाले की, कोटेशन देऊन वीज जोडणी लगेच दिली जाते. यासाठी मध्ये दुसरे कोणतेच छुपे खर्चांचा समावेश नसतो. असे असताना भ्रष्ट वृत्तीमुळे ग्राहकांना वेळेत वीज कनेक्शन दिले जात नाही. विविध माध्यमातून ग्राहकांचे मानसिक, आर्थिक शोषण केले जाते. अशाच प्रकारे राजेश मानकर त्याचे बळी ठरले आहेत.

अतिरिक्त कार्यकारी अभियंता शिरोळे, सहायक अभियंता साळवे आणि ठेकेदार तय्यब नाईकवाडी यांनी ग्राहकाला वीज जोडणी लवकर हवी असेल तर वायर आणून देण्यास सांगितले. याचे बिल वापस करण्याचा शब्दही तिघांनी दिला होता. प्रत्यक्षात त्यांची अद्याप अंमलबजावणी केली नाही. या विरोधात मानकार यांनी मुख्य अभियंता, सहव्यवस्थापकीय संचालक आणि जवाहर नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Advertisement

नियमाप्रमाणे कारवाई व्हावी

ग्राहक राजेश मानकर म्हणाले की, नियमबाह्यरित्या वायर खरेदी करायला लावणे, त्याची रक्कम परत न करणे, वेळेत वीज जोडणी न देणे, मानसिक व आर्थिक शोषण करणारे पन्नालालनगरचे महावितरणचे अधिकारी शिरोळे, साळवे आणि ठेकेदार तय्यब नाईकवाडी यांच्यावर महावितरण प्रशासनाने व पोलिस प्रशासनाने नियमाप्रमाणे कारवाई करावी. तसेच माझे 53 हजार 640 रुपये मला परत मिळावी.

Advertisement

त्यांची रक्कम परत देण्यास तयार
ठेकेदार तय्यब नाईकवाडी म्हणाले की, मी सध्या जी 20 परिषद विकास कामात व्यस्त आहे. मानकर यांची रक्कम परत करण्यास मी तयार आहे. चेकद्वारे किंवा कॅश स्वरूपात लवकरच ती परत करेल.

पन्नालालनगरचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता शिरोळे यांना या विषयी विचारणा केली असता, मला काहीच बोलायचे नाही, असे ते म्हणाले. वरिष्ठ अधिकारी म्हणतात आमच्याकडे तक्रारच आली नाही. याची चौकशी केली जाईल.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement