विशेष अधिवेशनाला विरोधी पक्ष जाणार?: संजय राऊत म्हणाले- केंद्रसरकार अरुणाचल, मणिपूरवर चर्चा करताय का? तर पाठिंबा देऊ

विशेष अधिवेशनाला विरोधी पक्ष जाणार?: संजय राऊत म्हणाले- केंद्रसरकार अरुणाचल, मणिपूरवर चर्चा करताय का? तर पाठिंबा देऊ


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Will The Opposition Party Go To A Special Session? | Sanjay Raut On Special Session Of Parliament Said Whether To Discuss Manipur Attack Pm Modi 

13 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

केंद्राने 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनाचा अजेंडा अद्यापही गुलदस्त्यात आहे. परंतु, ‘समान नागरी कायदा’, ‘एक देश एक नेशन’ सह अनेक विधेयकांवर या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. इंडियाचं नाव भारत करण्यावरही चर्चा होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हे विशेष अधिवेशन महत्त्वाचे मानले जात आहे. या अधिवेशनावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Advertisement

सर्वपक्षीय बैठकीत ठरवू

संजय राऊत म्हणाले की, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सरकारने त्यांच्या अमृतकालानिमित्त अचानक विशेष अधिवेशन बोलावले आहे. आम्ही ‘त्या’ अधिवेसशनात सहभागी व्हायच की नाही ते बैठकीत ठरवले जाईल. परंतू या अधिवेशनाची गरज नव्हती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हीच भूमिका घेतली. हे अधिवेशन कशाला बोलावलं आहे? तुमच्या प्रचारासाठी का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

Advertisement

दोन विषयावर चर्चा झाली पाहिजे

संजय राऊत म्हणाले की, मणिपूरवर चर्चा करताय का? अरुणाचल प्रदेशमध्ये चीन घुसले आहे, त्यावर चर्चा करताय का? मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष काही पावले उचलणार आहात का, या विषयावर चर्चा होणार असेल तर आम्ही पाठिंबा देऊ. पण तुमच्या प्रचारासाठी सुरू असेल तर त्यासंदर्भात आम्हाला चर्चा करावी लागेल, असे संजय राऊत एका वृत्तवाहिणीशी बोलताना म्हणाले.

Advertisement

हे ही वाचा

शरद पवारांचा मोदींवर आरोप:म्हणाले- त्यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले, मात्र खासदारांना कोणताच अजेंडा दिलेला नाही

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले. मात्र, या अधिवेशनाचा कोणताही अजेंडा आम्हा खासदारांना देण्यात आलेला नाही, त्यामुळे या अधिवेशनाबाबत आम्हाला काहीही माहिती नाही. देशातील महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी हा विषय काढण्यात आला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केला. – येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Advertisement