विशाखा समिती: ठाण्यातील फलकावरील नाव झाकून टाकावे लागल्याने पोलिसांची झाली नाचक्की


औरंगाबादएका मिनिटापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

दारू पिऊन महिलेचा विनयभंग करण्याप्रकरणी अटक आणि निलंबित करण्यात आलेला सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे महिला कर्मचाऱ्यांना लैंगिक छळाविरोधात न्याय मिळवून देणाऱ्या विशाखा समितीचा उपाध्यक्ष असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. विशेष म्हणजे, त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही विशाखा समितीच्या फलकावर उपाध्यक्ष म्हणून दोन दिवस झळकत असलेले त्याचे नाव कागदाने झाकण्याची नाचक्की शहर पोलिसांवर आली आहे.

Advertisement

कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या छळाचा प्रतिबंध, संरक्षण आणि निवारण करण्यासाठी २०१३ च्या कायद्यानुसार प्रत्येक कार्यालयात विशाखा समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यांच्या सदस्यांची माहिती देणारे फलकही दर्शनी भागात लावण्याची कायदेशीर तरतूद आहे. त्यानुसार पोलिस आयुक्तालयाच्या स्वागत कक्षातच विशाखा समितीचा फलक झळकतो आहे. यातील एका नाव सफेद कागद चिकटवून झाकून टाकण्यात आले आहे. हे नाव आहे, संक्रांतीच्या दिवशी अटक करण्यात आलेला सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे याचे. विशाखा समितीचे उपाध्यक्ष असलेले ढुमे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल होणे हा पोलिस प्रशासनाच्या प्रतिमेवर काळिमा मानला जात आहे.

१५ जानेवारीला काढली छेड १५ जानेवारीच्या रात्री ढुमे यांनी मद्याच्या नशेत एका महिलेची छेड काढली होती आणि तिच्या घरात घुसून नातलगांनाही मारहाण केल्याचा व त्यांना धमकावल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात अटक झाल्याने गृह खात्यास त्यांचे निलंबनही करावे लागले आहे.

Advertisement

तत्काळ काढून टाकले विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक झाल्यावर विशाखा समितीच्या उपाध्यक्षपदावरून ढुमेला तत्काळ काढून टाकण्यात आले होते. याचे आम्ही स्वागत करतो, मात्र झाल्या प्रकाराचा निषेध करतो. – मंगला खिंवसरा, अशासकीय सदस्य, विशाखा समिती

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement