विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक: अमरावतीमध्ये हेल्थ एम्प्लाईज फेडरेशनचे जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Amravati, The Health Employees Federation Staged An Indefinite Sit in In Front Of The Zilla Parishad; Staff Aggressive For Various Pending Demands

अमरावतीएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हेल्थ एम्प्लाईज फेडरेशनने आज, सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले. मागण्या मान्य होईस्तोवर आंदोलनातून माघार घेतली जाणार नाही, असे युनियनचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र शिंदे यांचे म्हणणे आहे. या आंदोलनात परिचारिका, कक्षसेवक, रुग्णसेवक यांच्यासह आरोग्य विभागातील विविध संवर्गाचे कर्मचारी सहभागी झाले आहेत.

Advertisement

मेळघाट येथील बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना त्वरेने कार्यमुक्त करावे, सर्व संवर्गनिहाय पदोन्नती प्रकरणे त्वरित निकाली काढण्यात यावे, दरमहा दिले जाणारे वेतन 1 ते 5 तारखेदरम्यान व्हावे, कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबतची न्यायालयीन प्रकरणे त्वरेने निकाली काढावी, कालबद्ध प्रकरणे त्वरित सोडवावी, वैद्यकीय बिल-स्थानिक प्रवास भत्त्याचा निधी त्वरेने उपलब्ध करुन द्यावा, सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे सर्व लाभ अदा केले जावे, डीसीपीएसची कपात संबंधितांच्या खात्यात त्वरेने जमा करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

हेल्थ एम्प्लाईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात या आंदोलनात विनोद डोंगरे, रजनीकांत श्रीवास्तव, अशोक पोकळे, सुभाष चव्हाण, विनोद पारोदे, गोकुळ बांबल, साहेबराव वानखडे, राजेश पणजकर, राजू मेश्राम, कामाजी हराळ, प्रदीप होले, गोपाल ठोसर, कविता पवार, शालिनी गवई, लक्ष्मी बनसोड, शालिनी भाकरे, सुजाता रोडगे, मालती पाटील, सुनंदा राऊत, अतुल वानखडे, कुलदीप रुद्रकार, विवेक उमक, प्रवीण औगड, आकाश हिंगलासपुरे, संजय लखनऊवाले, संदीप कात्रे, दादाराव निंघोट, दिनेश साबळे, संजय पटके, हेमंत सूर्यवंशी, दिनकर शिंदे, भूषण कविश्वर, मंगला धांड़े, विप्रा तलमले, संगीता लोखंडे, मीनाक्षी डहाळे, सुनिता घुगे, ज्योत्सना अंबाडकर, इंद्रायणी पवार, वंदना धिकार, शरयु खलाले, अस्मिता चंदनखेडे, लिला इरपाचे, सुनंदा कवाने आदी कर्मचारी सहभागी झाले आहेत.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement