सोलापूरएका मिनिटापूर्वी
- कॉपी लिंक
आर्य वैश्य कोमटी समाजातर्फे आयोजिलेल्या हळद अन् ऊसाच्या विवाह सोहळ्यात संक्रांतीच्या सणा निमित्ताने झाडांचे महत्व, मातीशी नातं, प्रथा-परंपरा जपण्याचा संदेश देण्यात आला. नगरेश्वर मंदिरात दुपारी केगाव पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य डॉ. वैशाली कडूकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विवाह सोहळा झाला.
नगरेश्वर मंदिर ट्रस्टचे पंच कमिटीचे पदाधिकारी महेंद्र सोनशेट्टी, अतुल भावठमकर, महेश सोनशेट्टी, संजू कोंडेवार, अमर पारसवार, राजकुमार पत्तेवार, संतोष कोंडेवार, संजू मोतेवार, राजकुमार रुद्रावार, लक्ष्मीकांत कुऱ्हा, राजशेखर जाजी, प्रमोद बच्चूवार, आर्य वैश्य महिला मंडळाच्या अध्यक्षा सरोज बच्चूवार आदींची उपस्थिती होती. सजावट स्पर्धांचे बक्षिस वितरण उज्वला याचम, वंदना घंटेवार, वंदना सोमशेट्टी, रसिका याचम, प्रज्ञा पांपटवार, वैशाली पत्तेवार आदींना करण्यात आले. गोविंद दिनकर गवई यांनी पौरोहित्य केले.