विवाहितेची आत्महत्या: प्रियकरावर गुन्हा‎ ; जुना विडी घरकुल‎ परिसरातील घटना‎


सोलापूर‎20 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

विवाहित महिलेस आत्महत्या‎ करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी‎ संदीप राठोड (रा. विजय ब्रह्मनाथ‎ नगर, मुळेगाव रोड) या तरुणाविरुद्ध‎ गुन्हा दाखल झाला आहे.‎ कविता प्रभाकर कल्याणम (वय‎ ३५, रा. भारत नगर, जुना विडी‎ घरकुल) यांनी तीन दिवसांपूर्वी ४‎ मार्चला घरी गळफास घेऊन‎ आत्महत्या केली होती. त्यांच्या आई‎ सुनंदा हरी चिक्का (रा. जी ग्रुप,‎ जुना विडी घरकुल) यांनी‎ एमआयडीसी पोलिसात ६ मार्च‎ रोजी फिर्याद दिली आहे. ऑक्टोबर‎ २०२१ ते ४ मार्च २०२३ या‎ कालावधीत तो विवाहितेस त्रास देत‎ होता.‎ कविता कल्याणम यांचे पती‎ तामिळनाडू येथे कामाला आहेत.‎ त्यांना अकरा वर्षाचा मुलगा आहे.‎

Advertisement

सासू व सासरे आहेत. ते जुना विडी‎ घरकुल सध्या राहत होते. यापूर्वी ते‎ ब्रम्हनाथ नगर, मुळेगाव रोड येथे‎ राहण्यास असताना त्यांच्या शेजारी‎ राहणारा संदीप राठोड सोबत‎ कविताचे प्रेमसंबंध होते. याबाबत‎ नातेवाइकांनी समजावून‎ सांगितल्यानंतर तिने प्रेमसंबंध‎ तोडले होते. पुन्हा कविता कल्याणम‎ या दुसरीकडे राहण्यासाठी आल्या.‎ तेथे आल्यानंतरही ‘तू माझ्याशी‎ असलेले प्रेमसंबंध तोडायचे‎ नाहीत’, असे सांगत तो सातत्याने‎ दमदाटी, मारहाण करण्याची धमकी‎ देत होता. फोन करून त्रास देत‎ होता. राठोडच्या त्रासाला कंटाळून‎ त्यांनी घरी गळफास घेऊन‎ आत्महत्या केली होती. फौजदार‎ अनिल वळसंगे तपास करत आहेत.‎ याबाबत पोलिस निरीक्षक राजन‎ माने यांना विचारले असता, संदीप‎ राठोड याचा शोध सुरू असल्याचे‎ ते म्हणाले.‎

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement