विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचे भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यावर टीकास्त्र: म्हणाले- ज्यांना स्वत:ची तिकीट वाचवता येत नाही, त्यांनी काँग्रेसबद्दल का बोलावे ?

विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांचे भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यावर टीकास्त्र: म्हणाले- ज्यांना स्वत:ची तिकीट वाचवता येत नाही, त्यांनी काँग्रेसबद्दल का बोलावे ?


अमरावतीएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांच्याच पक्षात स्वत:ची तिकीट वाचविता आली नव्हती. त्यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांबद्दल खरेच बोलावे का ? असा प्रतिप्रश्न करीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांवर टीका केली. ‘घर चलो’ अभियानांतर्गत बावनकुळे यांनी ‘काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांच्यासमोर प्रत्येकाला आपले रिपोर्ट कार्ड सादर करावे लागते, त्यामुळे वडेट्टीवार अलिकडे खूप बोलत सुटले आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्या प्रश्नाच्या उत्तरात वडेट्टीवार यांनी वरील प्रतिप्रश्न केला.

Advertisement

कॉंग्रेसतर्फे 5 सप्टेंबरपासून जनसंवाद यात्रा

काँग्रेस पक्षातर्फे येत्या 5 सप्टेंबरपासून ‘जनसंवाद यात्रा’ काढली जाणार आहे. त्या कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी वडेट्टीवार आज, शनिवारी अमरावतीत आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवटेकडी परिसरातील काँग्रेस भवनात बोलताना ते म्हणाले, बावनकुळे यांना गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाने उमेदवारही केले नव्हते. त्यांची व त्यांच्या अर्धांगिनीची तिकीट कापली होती. त्या बावनकुळे यांच्या बोलण्याला काय अर्थ उरतो. ते मनकवळे आहेत, तसा मी नाही. त्यामुळे ते जे बोलतात, त्याला फारसे महत्व देण्याचे कारण नाही.

Advertisement

वडेट्टीवार यांच्यामते केंद्र आणि राज्यात भाजपच्या नेतृत्वातील सरकारे आहेत. परंतु त्यांची कार्यशैली पुर्णत: जनताविरोधी आहे. त्यामुळे जनतेचा तो असंतोष लक्षात घेता काँग्रेसला मोठी संधी आहे. गेल्या वेळी राहुल गांधी यांनी 3 हजार 500 किलोमीटरची पदयात्रा काढली होती. त्यावेळी त्यांनी लोकांची दु:ख जाणून घेतली. आता त्या दु:खावर फुंकर घालण्यासाठी आपण त्यांच्यापर्यंत पोचलो पाहिजे. ते निश्चित आपल्याप्रती सहानुभूती बाळगून आहेत. त्यामुळे आठवड्यातून केवळ एक दिवस, नव्हे त्या दिवसातील केवळ चार तास द्या आणि काँग्रेसला मजबूत करा, असे आवाहनही त्यांनी केले.

सध्या देशात खून, दरोडे, बलात्कार ह्या नित्याच्या बाबी झाल्या आहेत. या सरकारने कायदा अगदी धाब्यावर बसवला आहे. या स्व मुद्द्यांची मांडणी आगामी जनसंवाद यात्रेत केली जाईल. ही जनसंवाद यात्रा माँ जिजाऊ यांची पावनभूमी असलेल्या सिंदखेडराजा येथून सुरु होणार असून आठवडाभरानंतर 15 तारखेला या यात्रेचा समारोप केला जाईल. यात्रेदरम्यान 9 ते 11 सप्टेंबरला मी स्वत: अमरावती जिल्ह्यात असेल. यावेळी रोजच्या दोन सभा याप्रमाणे जिल्ह्यात चार ठिकाणी मोठ्या सभा घेतल्या जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या शेतकरी, विद्यार्थी, महिला, व्यापारी, मजूर असे सगळेच घटक त्रस्त झाले आहेत. त्यांना आधार देण्यासाठी काँग्रेसच खरा पर्याय आहे.

Advertisement

यावेळी आमदार बळवंतराव वानखडे, माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर मिलींद चिमोटे व विलास इंगोले, जिल्हा परिषदेचे माजी सभापती हिंगणीकर उपस्थित होते.Source link

Advertisement