बीड6 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
राजकीय जीवनात अनेकदा काही पर्याय ठोस निर्णय घ्यावे लागतात. तर राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असे प्रतिपादन अजित पवार यांनी बीडमधील सभेत केले. विरोधक नेहमी दिशाभूल करतात, त्याकडे लक्ष देऊ नका, बीडकरांनो केवळ तुमच्या आशिर्वादासाठी या ठिकाणी आलो आहे. ही भूमी संतांची भूमी आहे. मी कामाचा माणूस आहे, लोकांचे काम करण्यासाठीच मी महायुतीत गेलो आहे. काही जण चुकीचे विधाने करत आहेत. त्यात काहीही तथ्य नाही, त्यांना मी कामातूनच उत्तर देणार आहे. असेही अजित पवार म्हणाले.
आम्ही लोकांचे काम करणारे लोक
माझी मराठवाड्याची भूमी संतांची भूमी आहे. समतेचा मार्ग आदर्श आहे. बीड जिल्हा ही भूमी कष्टकऱ्यांची भूमी आहे. महायुतीच्या सरकारमधील आम्ही सर्व मंत्री आम्ही लोकांचे काम करण्यासाठी आम्ही करायचो.
प्रत्येकाच्या जीवनात राजकीय चढउतार येत असतात. शाहु फुले आंबेडकरांच्या विचारांनीच जाणारे आहोत. आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये असलो तरी आम्ही सर्वजातीधर्मातील लोकांना वाटले पाहिजे की, हे सरकार सर्वांचे आहे.
एक रुपयात पीकविमा हे बीडचे पॅटर्न
केंद्राच्या योजना आणि राज्याच्या योजना सर्व सामान्यांच्या पर्यंत पोहोचवाच्या असतात. बीड जिल्ह्याचा पीक विमा उतरवणार नाही. त्यासाठी एक पर्याय काढला. तो पर्याय म्हणजे एक रुपयात शेतकऱ्यांचा पीकविमा काढण्याच्या काम हाती घेतले आहे. त्यामुळे अनेक लोकांनी पीकविमा काढला. त्यामुळे साडे चार हजार कोटी रुपयाचा बोजा राज्यावर पडला आहे. तरी देखील आम्ही ते स्वीकारले आहे.
विरोधक दिशाभूल करण्याच्या प्रयत्न करतात
लोकांना शेतकऱ्यांना लाभ कसा दायचा असाच विचार केला. धनंजय मुंडे कांदा पिकासाठी दिल्लीला गेले. सत्तेचा वापर लोकांसाठी झाला पाहिजे. केंद्र सरकारने मदत केली. काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी भरपूर पाऊस पडतो.
…म्हणून सरकारमध्ये सामील झालो
नंतरच्या काळात जे सरकार आले. तेव्हा राज्यातील प्रश्न सोडवायचे असतील. काही साखर कारखाने असतील त्यासाठी निधी लागणार, मतदार संघाचे कामे करायचे. त्यामुळे अनेक प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी आणि सोडविण्यासाठी आम्ही शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झालो आहोत.
अजित पवार म्हणाले की, बीडची राजकीय वैशिष्ट्ये आहे. वैचारिक मतभेद जपले असले तरी राजकीय वैरी कधी पेरले गेलेले नाही. अशोकराव चव्हाण, गोपिनाथ मुंडे यांची मैत्री सर्वपरिचित व प्रसिद्ध आहे. या ठिकाणी आम्ही निवडणूकाकरीता थातूरमातूर आश्वासन देणार नाही. आम्ही कधीही लोकांना अंतर करणार नाही, आम्ही बीडकरांचे मदत व सर्व प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करू. असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.
बीडचे पालकमंत्री राष्ट्रवादीकडे येईल
अजित पवार म्हणाले की, बीड जिल्ह्याला राष्ट्रवादीचा पालकमंत्री मिळाला पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करेन. धनंजय मुंडे यांनी संघर्ष केला आहे. सातत्याने संघर्ष करत आहे. त्यांनी स्वतःचे व्यक्तीमत्त्व घडवले. अनेक अडचणींना सामना दिला. त्यामागे तुम्ही लोकांनी देखील साथ दिली आहे.