विमानतळाची पायाभरणी: जेवर विमानतळाच्या शिलान्यासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले, जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे विमानतळ


  • Marathi News
  • National
  • Pm Modi | Marathi News | Jevar Airport | When Prime Minister Narendra Modi Arrives For The Groundbreaking Ceremony Of The Airport, The World’s Fourth Largest Airport

Advertisement

नवी दिल्ली16 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जेवर विमानतळाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला पोहोचले आहे. मोदी यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे देखील आहे. मंचावर येण्यापूर्वी मोदी हे जेवर विमानतळाच्या मॉडेलची पाहणी करत आहे.

Advertisement

नोएडा प्राधिकरणाविरोधात 1 सप्टेंबरपासून धरणे आंदोलन करणाऱ्या 60 हून अधिक शेतकऱ्यांना पंतप्रधानांच्या आगमनापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या शेतकऱ्यांना गाझियाबाद पोलिस लाईन्समध्ये ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आज जेवर येथे जाऊन पंतप्रधानांना निवेदन देण्याची घोषणा केली होती.

सप्टेंबर 2024 पासून विमानतळ उड्डाणासाठी होणा खुले

Advertisement

नोएडा इंटरनेशनल विमानतळ हा जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विमानतळ असणार आहे. सुमारे 6200 एक्करमध्ये याची उभारणी केली जात आहे. त्यासाठी सुमारे 29,650 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. पहिल्या टप्प्यात 1,334 हेक्टरवर रनवे तयार केले जाणार आहे. त्यासाठी 2024 पर्यंतचा कालावधी लागेल.

सप्टेंबर-2024 पासून भारतातील 9 शहरांसह दुबईसाठी उड्डाणे सुरू व्हावीव, असा सरकारचा मानस आहे. 2050 पर्यंत संपूर्ण विमानतळाचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, या विमानतळाजवळ विमानांच्या देखभालीसाठी देशातील सर्वात मोठे केंद्र देखील उभारले जाणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते या केंद्राची देखील पायाभरणी केली जाणार आहे.

Advertisement

सुरक्षा दलाचे 10 हजार जवान तैनात

नोएडा एडीसीपी रणविजय सिंह यांनी सांगितले की, पायाभरणी समारंभाच्या ठिकाणी तसेच आसपासच्या परिसरात सुमारे 10,000 सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये यूपी पोलिसांचे पाच हजार जवान आहेत. याशिवाय पीएसी आणि पॅरा मिलिटरी फोर्सचे तीन हजार जवान आहेत. या सर्वांशिवाय एसपीजी, एनएसजी, एटीएसचे कमांडो पोहोचले आहेत.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here