विभागीय बैठकीनंतर ठरणार शुंभागी पाटील यांच्या प्रचाराची रणनिती: सत्यजीत तांबे विरुध्द शुंभागी पाटील यांच्यात उडणार प्रचाराचा  धुराळा


नाशिक11 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

नाशिक विभागाच्या पदवीधर मतदार संघासाठी 22 इच्छुकांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले असुन सोमवारी (दि.16) माघारीचा दिवस आहे. त्यामुळे दुपारी 3 वाजेनंतर अंतिम उमेदवार निश्चित होणार आहे. परंतू अपक्ष सत्यजीत तांबे यांच्या विरोधात शुभांगी पाटील यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पांठिबा दिल्याने यांच्यात सरळ लढत होणार आहे.

Advertisement

डॉ.सुधीर तांबे यांनी सुरुवातीपासुन मतदारांची मोर्चेबांधणी केली असल्याने सत्यजीत तांबे यांच्यासाठी ही निवडणुक सोपी मानली जात होती. परंतू उद्धव ठाकरे यांनी धुळ्याच्या शिक्षिका शुंभागी पाटील यांना पांठिबा दिल्याने तांबे यांच्या समोर एक आव्हान निर्माण झाले आहे.

शिवसेनेने पाठिंबा दिल्यानंतर नाशिकच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खा.संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली पाटील यांच्या प्रचाराची जबाबदारी स्विकारली आहे. नाशिक विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर आणि नाशिक येथील शिवसेना पदाधिकारी आणि शुंभागी पाटील यांची एकत्रित बैठक होवून आगामी रणनिती आखली जाणार असल्याचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले. काँग्रेसने पाटील यांच्यासाठी अद्याप आपली भुमिका स्पष्ट केली नसुन त्यांच्याकडे देखील पाठिंबा मागणार असल्याचे शुभांगी पाटील यांनी सांगितले. तांबे यांच्यासाठी एकांगी होणारी निवडणूक आता खडतर होणार असली तरी डॉ. सुधीर तांबे यांचा अनुभव पुत्राच्या पाठीशी रहाणार असल्याने ती एक सकारात्मक बाजू रहाणार आहे.

Advertisement

उद्धव ठाकरे यांनी पाठींबा दिला असुन राष्ट्रवादी काँग्रेसने देखील पाठींबा दिला आहे. तसेच महाराष्ट्र टिचर्स संघटनेचाही पांठिंबा आहे. दोन दिवसात जिल्हानिहाय बैठका घेवून मेळावे, बैठका यांचे नियोजन करणार आहे

– शुभांगी पाटील, अपक्ष उमेदवार

Advertisement

डॉ. सुधीर तांबे यांनी नाशिक विभागातील शिक्षकासह तरुणांचे प्रश्न मार्गी लावले असल्याने ती आमच्यासाठी जमेची बाजु आहे. तसेच आम्ही जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी केल्याने त्याचा फायदा होणार आहे

– सत्यजीत तांबे, अपक्ष उमेदवार

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement