पुणेएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ने पुण्यातील कॉंम्प परिसरात असलेल्या रोझरी शिक्षण संस्थेचे संचालक विनय अऱ्हाना यांना 46 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अखेर शनिवारी अटक केली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर ईडीने आर्हानाच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.न्यायालयाने विनय आर्हानाला 20 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने विनय विवेक अरान्हा यांना सत्र न्यायाधीश मुंबई न्यायालय येथे शनिवारी हजर केले. त्यानंतर न्यायालयाने आरोपीस 20 मार्च पर्यंत ईडीकडे कोठडी मंजूर केली आहे. आत्तापर्यंतअनेकवेळा विनय विवेक अरन्हा यांची ईडी कडून चौकशी करण्यात आली होती. अखेर शनिवारी त्यांना अटक करण्यात आली आहे.
कॉसमॉस बँकेकडून आर्हानाने फसव्या पध्दतीने कर्ज घेतले. शाळांचे नुतनीकरण करण्यासाठी सदरील कर्ज मंजूर करण्यात आले होते. मात्र, कर्जाव्दारे मिळालेल्या पैशाचा उपयोग आर्हानाने हायफाय लाईफस्टाईल जगण्यासाठी तसेच बॉलीवूड मधील कलाकारसोबत कार्यक्रम आयोजित करण्यासाठी केला असल्याचा आरोप तपास यंत्रणांकडून करण्यात आला आहे.विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची भरमसाठ फीसाठी रोझरीकडून पिळवणूक होत असल्याचा आरोप करत अनेकवेळा पालकांनी करत आंदोलनं केल्याने सदर शाळा चर्चेत आली होती.
21 कोटी रुपये कलाकारांवर उधळले
कॉसमॉस बँकेकडून अरहाना याने सुमारे 46 कोटी 50 लाख रुपयांचं कर्ज मंजुर करण्यात आले. त्यापैकी 21 कोटी रुपये बँकेने अरहानाने सांगितलेल्या कंपन्यांच्या बॅक अकाउंटमधे जमा केले. सदर बोगस कंपन्याच्या अकाउंटमधे जमा झालेले पैसै विनय अरहानाने पुढे स्वतःच्या अकाउंटमधे वळवले आणि त्यामधून पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील एका आलिशान हॉटेलमधे फॅशन शोचे आयोजन करत आणि बॉलीवूड कलाकारांवर पैशाची उधळपट्टी केल्याचे उघडकीस आले आहे.