औरंगाबाद4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी सलग ४५ तासानंतर बुधवारी (३० नोव्हंबर) सकाळी संपली. ५ खुल्या प्रवर्गातून उत्कर्षने ४ जागा जिंकल्या. एका जागेवर अभाविप प्रणित विद्यापीठ विकास मंचने बाजी मारली. विजयासाठी निर्धारित २७४६ मतांचा कोटा पहिल्या फेरीत एकालाही पूर्ण करता आला नाही.
सकाळी साडे सातपर्यंत उत्कंठा शिगेला पोचली होती. डॉ. भारत खैरनार, हरिदास उपाख्य बंडु सोमवंशी आणि योगिता होके पाटील यांनी अखेरच्या क्षणी विजय मिळवला.
मतमोजणी केंद्राला बेगमपुराचे पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार, सिटी चौकचे पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांच्या मार्गदर्शनात तीन दिवस कडेकोट बंदोबस्त होता. मंगळवारी राखीव प्रवर्गाचे निकाल घोषित झाले. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता खुल्या ५ जागांसाठी २९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीतून उघडले.
वैध मतांच्या तुलनेत २७४६ मतांचा कोटा विजयासाठी निश्चित करण्यात आला होता. पण एकाही उमेदवाराला पहिल्या फेरीत हा कोटा पूर्ण करता आला नाही. उत्कर्षचे डॉ. नरेंद्र काळे यांना रात्री बारा वाजता बाराव्या फेरी अखेर विजयी घोषित केले. मध्यरात्री दीड वाजता शेख जहूर यांनी १८ व्या फेरीत विजय संपादन केला.
उत्कर्षचे डॉ. भारत खैरनार, हरिदास सोमवंशी, योगिता होके पाटील या तीन्ही उमदेवारांना मतमोजणीच्या २४ व्या म्हणजेच अखेरच्या फेरीत विजयी घोषित केले. डॉ. भारत खैरनार-२६७६, योगिता होके पाटील-२१७३, हरिदास सोमवंशी-१७२७ मते मिळाले. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. भगवान साखळे यांनी त्यांना प्रमाणपत्र दिले.
पहिली फेरी आणि कंसात बाद फेरीतील मते-
प्रा. संभाजी भोसले- ९५७ (१४४८), डॉ. रमेश भूतेकर- ८९० (१२१६), लक्ष्मण नवले-७१९ (८५०), विजय पवार-७२१ (८४०), अशिष नावंदर-४६५ (६१४), डॉ. तुकाराम सराफ-४४८ (५२४), प्रकाश इंगळे-४०१ (५२७), चंद्रकांत चव्हाण- ३५६, अमर कदम – २३६, पंकज बनसोडे-२८७, सुनील जाधव-२०१, सुनील गावीत-१२६, भागवत निकम -११८, पंडित तुपे-१०२, परमेश्वर वाघमारे -९९, हनुमंत गुट्टे- ९४, अमोल शिंगटे- ८५, पकंज बनसोडे-२२७, सुनील काळे- ३७, सतीश धुपे- ३१, सुचिता इंगळे- २९, नितीन फंदे- २१, अनिल तडवी-१५, विलास सरकटे-९