विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेवर पाठविल्या जाणाऱ्या सिनेटरची निवड: 10 फेब्रुवारीला विजयी झालेल्या 58 पैकीच निवडावे लागतील 8 सदस्य


अमरावती2 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधीसभेतून (सिनेट) व्यवस्थापन परिषदेवर (मॅनेजमेंट कौन्सिल) निवडून द्यावयाच्या आठ जागांचा फैसला आगामी 10 फेब्रुवारीला होणार आहे. राज्यपालांच्या परवानगीनंतर सिनेटची पहिली बैठक या दिवशी होत आहे. या बैठकीतच ही निवड घोषित केली जाईल. तसे पत्र सर्व सिनेट सदस्यांना पाठविण्यात आले आहे.

Advertisement

नोव्हेंबर महिन्यात निवडणूक पार पडल्यानंतरही सिनेटची पहिली बैठक आयोजित न केल्यामुळे गेल्या महिन्यात बहुतेक सिनेट सदस्यांनी विद्यापीठाशी पत्रव्यवहार करुन पहिली बैठक त्वरेने आयोजित केली जावी, अशी मागणी केली होती. दरम्यानच्या काळात विद्यापीठ प्रशासनानेही कुलपती तथा राज्यपाल महोदयांशी पत्रव्यवहार करुन बैठकीच्या आयोजनाची परवानगी मागितली होती. अखेर राज्यपालांनी 10 फेब्रुवारीला बैठकीचे आयोजन करण्यास अनुमती दिली आहे. या बैठकीतच व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांची निवड केली जाईल.

दोन प्राचार्य, दोन प्राध्यापक, शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापन संवर्गातून विजयी झालेल्या सहा सदस्यांपैकी दोन प्रतिनिधी आणि दोन नोंदणीकृत पदवीधर असे हे आठ सदस्य असतील. सिनेट निवडणुकीत प्राचार्य, प्राध्यापक आणि नोंदणीकृत पदवीधर या प्रत्येक संवर्गातून प्रत्येकी 10 सदस्य विजयी झाले आहेत. त्यापैकीच दोन निवडावयाचे असून प्रत्येक संवर्गातील एक सदस्य हा राखीव प्रवर्गातील असावा, असा नियम आहे.

Advertisement

इतर पाच सदस्यांचे नामनिर्देशनही

व्यवस्थापन परिषदेशिवाय विद्या परिषदेवर (अॅकडेमीक कौन्सिल) शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापनाचा एक प्रतिनिधी, स्थायी समितीवर एकेक प्राचार्य, प्राध्यापक व पदवीधर, तक्रार निवारण समिती तसेच विद्यार्थी कल्याण निधी यासाठी प्रत्येकी एक सिनेटर नामनिर्देशित केला जाणार आहे. याशिवाय शिक्षक कल्याण निधी साठी एक प्राचार्य आणि एका शिक्षकाचे नामनिर्देशन याच बैठकीत केले जाईल. त्यासाठीचे नियम, परिनियम आणि संवर्गही सिनेटच्या सर्व सदस्यांना विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Advertisement

….तर 31 जानेवारीलाच फैसला

व्यवस्थापन परिषदेवर पाठवावयाच्या 8 सिनेट सदस्यांसाठीचे उमेदवारी अर्ज आगामी 30 जानेवारीपर्यंत दाखल करावयाचे आहेत. छाननीअंती दुसऱ्या दिवशी उमेदवारांची अंतीम यादी घोषित केली जाईल. त्यानंतर 4 फेब्रुवारी हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असून आवश्यकता भासल्यास 10 फेब्रुवारीच्या सिनेट बैठकीत मतदान घेतले जाईल. त्यानंतर लगेच मतमोजणी करुन निकाल घोषित केला जाणार आहे. शक्यतो आठही सदस्यांची निवड ही एकमतानेच केली जाते. त्यामुळे त्यासाठीची नावे 31 जानेवारीलाच कळणार आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement