विद्यापीठातील 245 महाविद्यालये ‘नॅक’ पासून दूरच: वेळेच्या आता मानांकन न मिळाल्यास अनुदान व शिष्यवृत्ती थांबवण्याचा इशारा


अमरावतीएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने वारंवार सूचना दिल्यानंतरही पश्चिम विदर्भातील 245 महाविद्यालयांनी अजूनही नॅशनल अ‌ॅक्रेडीटेशन अँड असेसमेंट कमिटीचे (नॅक) मानांकन प्राप्त केले नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने पुन्हा एकदा या महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्रे लिहली असून निश्चित वेळेच्या आत मानांकन न मिळविल्यास अनुदान आणि शिष्यवृत्ती थांबविली जाईल, असा इशारा दिला आहे.

Advertisement

महाविद्यालयाची इमारत, शैक्षणिक दर्जा, दरवर्षीच्या निकालाची प्रतवारी, विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सोई – सुविधा, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या उपाययोजना, विद्यापीठ, शासन आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी नेमून दिलेल्या उपक्रमांमधील सहभाग आदी मुद्द्यांना धरुन ‘नॅक’द्वारे महाविद्यालयांचे मानांकन निश्चित केले जाते. पूर्वी असा प्रकार नव्हता. परंतु अलिकडच्या काळात तो रुढ झाला असून विद्यापीठ व युजीसीमार्फत महाविद्यालयाला उपलब्ध करुन द्याव्या लागणाऱ्या सोई – सुविधांसाठी तो अनिवार्यही करण्यात आला आहे.

विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात एकूण 408 महाविद्यालये आहेत. त्यापैकी 163 महाविद्यालयांनी आतापर्यंत ‘नॅक’ चे मानांकन प्राप्त केले आहे. स्थापनेपासून सहा वर्षे किंवा ज्या महाविद्यालयातून दोन बॅचेस बाहेर पडल्या आहेत, अशा महाविद्यालयांना ‘नॅक’चे मानांकन प्राप्त करणे अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या मते अमरावती विभागातील एकूण महाविद्यालयांपैकी 158 महाविद्यालये अनुदानित आहेत. या सर्व महाविद्यालयांना नॅकला सामोरे जाणे हा अत्यावश्यक आहे. परंतु त्यापैकी अजूनही 17 ते 18 महाविद्यालयांनी मूल्यांकन केले नसल्याचे दिसून आले आहे. शासन अ‌ॅक्शन मोडवर आले असून भविष्यात नॅक न करणाऱ्या महाविद्यालयांना अनुदान न देणे किंवा शिष्यवृत्ती थांबवण्यासारखा कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी ‘नॅक’ साठी घाई करणे आवश्यक आहे.

Advertisement

अशी आहे ‘नॅक’ची पद्धत

‘नॅक’ला सामोरे जाण्यासाठी संबंधित महाविद्यालयाला सर्वप्रथम सेल्फ स्टडी रिपोर्ट (एसएसआर) तयार करावा लागतो. दरवर्षी तयार कराव्या लागणाऱ्या अ‌ॅन्युअल क्वालीटी अ‌ॅसुरन्स रिपोर्टच्या (एक्यूआर) आधारे तो तयार होतो. तो ‘नॅक’कडे पाठविल्यानंतर संबंधित समितीचे पदाधिकारी एक विशिष्ट तारीख नेमून देतात. त्यावेळी प्रत्यक्ष पाहणी केली जाते. त्यानंतर मानांकन कळविले जाते.

Advertisement

अशी आहे ‘नॅक’ची श्रेणी

ए डबल प्लस हे ‘नॅक’चे सर्वोच्च मानांकन असून त्यानंतर ए प्लस, बी व सी अशाप्रकारे उतरत्या क्रमाने हे मानांकन दिले जाते. अर्थात ज्या महाविद्यालयाचा दर्जा जसा आहे, त्यानुसार त्या महाविद्यालयाला कोणती श्रेणी द्यायची, हे पाहणी करण्यासाठी आलेल्या ‘नॅक’च्या प्रतिनिधींद्वारे निश्चित केली जाते. पाच जिल्ह्यांपैकी अकोला येथील शिवाजी महाविद्यालय हे ए डबल प्लस श्रेणीचे एकमेव महाविद्यालय आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement