विदर्भासाठी संघर्ष: ‘लाठी खाऊ गोळी खाऊ, विदर्भ राज्य मिळवून घेऊ’ या घोषणेसह विदर्भवाद्यांचा एल्गार


अमरावती24 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोअर कमिटीची बैठक येथील सर्किट हाऊसमध्ये नुकतीच पार पडली. या बैठकीत वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मीतीवर मंथन करण्यात आले. येत्या ३१ डिसेंबरपूर्वी ही घोषणा करण्यास राज्यकर्त्यांना भाग पाडावे, असे विचार या बैठकीत मांडण्यात आले.

Advertisement

बैठकीच्या अध्यक्षस्थानी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव चटप होते. तर अतिथी म्हणून माजी मंत्री रमेश गजबे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र आगरकर, रंजना मामर्डे, अरुणभाऊ केदार, प्रभाकर कोंडबत्तुनवार, प्रा. पुरुषोत्तम पाटील, एड. सुरेश वानखडे, कैलास फाटे, युवा आघाडीचे मुकेश मासुरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान आंदोलनाची तीव्रता वाढवण्याच्या उद्देशाने आगामी १ जून रोजी संतनगरी शेगाव येथे विदर्भ आक्रोश मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

या मेळाव्यात गजानन महाराजांना साकडे घालून वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीकरिता सरकारला सद्बुद्धी दे अशी विनवणी करण्यात येणार आहे. दरम्यान “लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळून घेऊ” अशी खुणगाठ मनाशी बाळगून या मेळाव्यात प्रत्येक जिल्ह्यातून जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही या बैठकीत करण्यात आले. प्रास्ताविक व संचालन डॉ. विजय कुबडे यांनी केले. आभार हर्षा सगणे यांनी मानले.

Advertisement

बैठकीला सुधाताई फावडे, शहराध्यक्ष रियाज खान, सरला सपकाळ, ज्योतीताई खांडेकर, मृणाली मुळे, सुषमा मुळे, दिलीप भोयर, या बैठकीला वाशिम जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गजानन अमदाबादकर, सतीश दाणी, ओमप्रकाश तापडिया, राजेंद्रसिंह ठाकुर, नरेश निमजे, जी. यु. पाटील, अविनाश वानखडे, सतीश प्रेमलवार, किशोर दहेकर, रफीक रंगरेज, नासिर जुमान शेख, सुरेश जोगळे, आनंद मुळे, राजेंद्र ठाकरे, प्रकाशबाबू खरुले, लक्ष्मणराव वानखडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.



Source link

Advertisement