अकोला23 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
अकोला यंदाच्या उन्हाळ्यात विदर्भामध्ये अकोल्यात रविवारी ४४ अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
विशेष म्हणजे शुक्रवारी ४३.७, तर शनिवारी ४४.४. अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले हाते. मात्र सायंकाळी ५ नंतर तापमान घटल्याचे जाणवले असून, विदर्भात पावसाचा अंदाजही हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत अाहे.
तापमानात चढउतार
जिल्ह्यात मार्च महिन्यापासूनच तापमान वाढले. मात्र १५ ते १९ मार्च दरम्यान अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे वातावरण घटले. त्यानंतर एप्रिल महिन्यात पुन्हा तापमान वाढले. मात्र एप्रिल महिन्यात पुन्हा अवकाळी पाऊस झाल्याने गारवा निर्माण झाला.
परंतु मे महिन्यातील तिसऱ्या आठवड्यापासून पुन्हा वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून, ४० अंशांहून अधिक तापमान नाेंदवण्यात येत अाहे. राज्यात एकीकडे उन्हाचा चटका जाणवत असताना दुसरीकडे विदर्भात पुढचे तीन दिवस हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे.रविवारी दुपारी साडेतीन ते ४ वाजपर्यंत कडक ऊन होते. मात्र दुपारी एकदम ढगाळ वातावरण तयार झाले व वारे सुटले.
…त्यामुळे पडणार पाऊस
बंगालच्या उपसागरात नैर्ऋत्य मोसमी वारे पुढे सरकल्याने पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे अाहे. पश्चिमी अडथळ्यांच्या प्रभावामुळे वायव्य भागात मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता अाहे. २२ ते २४ मे रोजी विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.