‘वाह’ पासून ‘आह’ असा गझलेचा प्रवास: साहित्य माणसे जोडण्याचे कार्य करते तर गझल व्यक्तीसापेक्षता मानते – गझलकार अनंत नांदूरकर


अमरावती16 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

साहित्य माणसे जोडण्याचे कार्य करते तर गझल व्यक्तीसापेक्षता मानते. ती एक वेगळी विधा असून तिची तंत्रशुद्धता हेच तिचे बलस्थान असते. वाह पासून आह असा गझलेचा प्रवास असतो. गझल आंतरमनाची कळ व बाह्य संघर्षाची झळ असते. ती काळजात साखर पेरते. अशी अनुभूती प्रखर सामाजिक जाणिवा संप्रेषित करणा-या चंद्रशेखर भुयार यांच्या “समाधी” या गझल संग्रहातुन वाचकास येते, असे मत मराठी, हिंदी, उर्दूचे ख्यातनाम गझलकार अनंत नांदूरकर “खलिश” यांनी व्यक्त केले.

Advertisement

येथील अभियंता भवन येथे “समाधी” या गोटीबंद गझल संग्रहाचे प्रकाशन पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मनपाचे माजी नगरसेवक तुषार भारतीय होते. दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते गीतकार प्रा. डॉ. गोविंद गायकी, महाराष्ट्र साहित्य संगमचे सदस्य पुष्पराज गावंडे, नाना लोडम, अंकुर साहित्य संघाचे अध्यक्ष हिंमत ढाले, ललित कदम व गझलकार चंद्रशेखर भुयार मंचावर उपस्थित होते. भुयार यांची गझल वाचकाशी थेट संवाद साधणारी असून गझलकाराच्या प्रखर सामाजिक जाणिवा व त्यांचा अध्यात्मिक पिंड अधोरेखीत करते. रुपकं, प्रतिमा, प्रतीकांच्या सुयोग्य वापराने भुयारांची गझल सामन्यतेतही आपले वेगळेपण जोपासते व त्यामुळेच त्यांचे शेर आल्हाददायक व थेट वाटतात. चिंतनशिलतेच्या गर्तेत हरवून त्रयस्थपणे लिखाण केल्याने या गझल संग्रहाचे “समाधी” हे शीर्षक योग्य आहे,” असे नांदूरकर पुढे म्हणाले.

आपल्या भाषणात ढाले यांनी भुयार यांचे लिखाण गझलेला ख-या अर्थाने उभारी देणारे असल्याचे मत व्यक्त केले. तर ललित कदम यांनी भुयारांच्या गझलेत राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक बाबींचा योग्य समन्वय असल्याचे सांगून जीवनदृष्टी फकिरीची झाली तरच माणूस गझलेत “बादशहा” होतो, असे विचार मांडले. प्रा. गायकी यांनी भुयारांची गझल वेगळी असल्याने गझल प्रांतात ती टिकेल व त्यांचा संग्रह मैलाचा दगड ठरेल, असा आशावाद व्यक्त केला. याप्रसंगी पुष्पराज गावंडे व नाना लोडम यांचीही समयोचित भाषणे झाली.

Advertisement

अध्यक्षीय भाषणात तुषार भारतीय यांनी व्यवस्था बदलण्याचे उत्तम शस्त्र गझल असल्याचे सांगून भुयारांचा गझल संग्रह परिपूर्ण असल्याचे मत मांडले. दरम्यान मनोगत व्यक्त करताना भुयार यांनी ‘समाधी’ हे गझल क्षेत्रातील आपल्या तपपूर्तीचे सार्थक असून यातील प्रत्येक शेर हेच आपले मनोगत असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलनाने झाला. प्रा. रवी चापके यांनी सुत्रसंचालन केले तर महेन महाजन यांनी आभार मानले.

——-***——

Advertisement

बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement