वासुदेवराव कोकाटे स्मृती व्याख्यानमाला‎: शिक्षणातून व्यक्तिमत्व विकास‎ साधला जाताे : मधुकर कोकाटे‎


दर्यापूर‎2 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

शिक्षण हे व्यक्तिमत्व विकासासाठी‎ असते. त्याचा चुकीने रोजगार किंवा‎ नोकरीशी संबंध जोडला जातो, असे‎ प्रतिपादन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे‎ माजी अध्यक्ष मधुकर कोकाटे यांनी‎ केले. येवदा येथील कला वाणिज्य‎ महाविद्यालयात कैलासवासी‎ वासुदेवराव कोकाटे स्मृतीनिमित्त एक‎ दिवसीय व्याख्यानमालेचे नुकतेच‎ आयोजन करण्यात आले होते. त्या‎ प्रसंगी अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन‎ करताना ते बोलत होते.‎ कार्यक्रमाला उद््घाटक म्हणून संस्था‎ सचिव गजानन कोकाटे, तर प्रमुख‎ वक्ता म्हणून नरसम्मा कला विज्ञान‎ महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख‎ डॉ. पंकज वानखडे, डॉ. नासिरुद्दीन‎ अन्सार, प्राचार्य डॉ. वाय. जी. सिंग‎ उपस्थित होते.

Advertisement

संस्था सचिव गजानन‎ कोकाटे यांनी आपल्या उद््घाटनपर‎ मनोगतातून कै. वासुदेवराव कोकाटे‎ यांच्या स्मृतीला उजाळा देवून त्यांच्या‎ वाचन कौशल्याविषयी मार्गदर्शन‎ करताना ज्ञान हे क्षितिजासारखे‎ असल्याचे प्रतिपादन केले.‎ व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना डॉ.‎ पंकज वानखडे यांनी संत गाडगेबाबा‎ यांचा कर्मयोग व आजचे समाज जीवन‎ या विषयावर सखोल विवेचन करून‎ गाडगेबाबांच्या जीवनातील विविध‎ प्रसंगाचे दाखले देताना उपस्थित‎ श्रोत्यांना आत्मचिंतन करण्यास भाग‎ पाडले. व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प डॉ.‎ नसिरुद्दीन अंसार यांनी गुंफले.

या वेळी‎ त्यांनी शिक्षण आणि व्यक्तिमत्व विकास‎ या विषयावर बोलताना श्रोत्यांची दाद‎ मिळवली त्यांनी शिक्षणातून‎ सकारात्मकता दृष्टिकोन, चरित्र, संयम,‎ वाचन या बाबी द्वारे आपले खरे‎ व्यक्तिमत्व साकारत जाते, हे विविध‎ उदाहरणांमधून पटवून दिले.‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अतुल‎ टेवरे, तर आभार प्रदर्शन डॉ. अनिल‎ कत्रोजवार यांनी केले. मान्यवरांचा‎ परिचय डॉ. सय्यद सज्जाद यांनी करून‎ दिला. कार्यक्रमाला येवदा आणि‎ पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक,‎ सरपंच, पोलिस पाटील, विद्यार्थी वर्गाचे‎ पालक, महिला आणि‎ महाविद्यालयातील पदवी आणि‎ पदव्युत्तर विद्यार्थी मोठ्या संख्येने‎ उपस्थित होते.‎

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement