वार-पलटवार: भास्कर जाधव सडक्या मेंदुचा, 2024 च्या निवडणुकीत त्यांना 20 फूट खोल गाडणार, रामदास कदम यांची टीका


खेडएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

भास्कर जाधव हा सडक्या मेंदुचा आहे. 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत मी भास्कर जाधव यांना 20 फूट खोल गाडणार, असे वक्तव्य रामदास कदम यांनी केले आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रत्नागिरीतील खेड येथे सभा होत आहे. त्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना रामदास कदम यांनी अशाप्रकारची सणसणीत टीका केली आहे.

Advertisement

रामदास कदम म्हणाले, माझ्या कोकणासाठी काहीतरी चांगले होऊ दे. चांगले निर्णय घ्यावे. केवळ राजकीय शिमगा नको. राजकीय सभा नको. या सभेचा लाभ माझ्या कोकणासाठी व्हावा. महाराष्ट्राचे अनेक चांगले निर्णय शिंदे-फडणीस यांनी घेतले. निर्णयाचा सपाटा त्यांनी लावला आहे. केंद्रातून निधी आणत आहेत. म्हणून देवीला आज साकडे घातले आहे. माते एकनाथ शिंदेंना सुबुद्धी दे, चांगली बुद्धी दे आणि कोकणासाठी चांगल्या घोषणा त्यांच्याकडून होऊ दे.

शिवसेना नेते रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांनी या सभेचे आयोजन केले आहे. सभेची तयारी पूर्ण झाली आहे. आज सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे. ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नुकतीच खेडमध्ये सभा झाली होती.

Advertisement

शिंदे काय प्रत्युत्तर देणार

या सभेत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली होती. या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठीच रामदास कदम यांनी या सभेचे आयोजन केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

रेकॉर्ड ब्रेक सभा होईल

कोकणातील जेवढ्या सभा झाल्या त्या सभांचा रेकॉर्ड ब्रेक होईल, असा दावा रामदास कदम यांनी केला आहे. ते म्हणाले, माझ्या आत्ताच्या बोलण्यावरुन समजून घ्या सभा कसी असेल असा इशाराच कदम यांनी विरोधकांना दिला.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement