वारीमध्ये चोरी: पालखी दर्शनावेळी तीन महिलांचे पावणे दोन लाखांचे मंगळसूत्र लंपास; विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


पुणेएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

आषाढी वारीकरिता आळंदी आणि देहू येथून लाखाे वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रस्थान केलेल्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी बुधवारी संध्याकाळी पुण्यात दाखल झाल्या. यादरम्यान पालखीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या तीन महिलांच्या गळयातील पावणेदाेन लाख रुपये किमतीचे माैल्यवान मंगळसूत्र चाेरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पाेलिस ठाण्यात अज्ञात आराेपी विराेधात चाेरीचा गुन्हा बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी गुरुवारी दिली आहे.

Advertisement

याप्रकरणी पाेलिसांकडे कल्पना शरद गायकवाड (वय-27,रा.वाघाेली,पुणे) यांनी एक अनाेळखी महिले विराेधात तक्रार दाखल केली आहे. कल्पना गायकवाड यांच्यासह शालीनी मुसळे व ज्याेती रणधीर अशा तिघी येरवडा परिसरातील इंदिरानगर येथील दत्त मंदिराच्या समाेर संत ज्ञानेश्वर माऊलींचे पादुकांचे दर्शन घेत हाेत्या. त्यावेळी एका अनाेळखी महिलेने गायकवाड यांचे गळयातील 90 हजार रुपये किंमतीचे तीन ताेळे वजनाचे मंगळसुत्र, शालिनी मुसळे यांचे 75 हजार रुपये किंमतीचे अडीच ताेळे वजनाचे साेन्याचे मंगळसुत्र आणि ज्याेती रणधीर यांचे 15 हजार रुपये किंमतीचे अर्धाताेळे वजनाची साेन्याची चैन असे तिघींचे मिळून एक लाख 80 हजार रुपयांचे गळयातील साेन्याचे मंगळसुत्र व साेनसाखली पाठीमागुन येऊन जबरदस्तीने हिसका मारुन ओढुन-ताेडुन जबरी चाेरी करुन नेली आहे. याप्रकरणी संबंधित अनाेळखी महिलेचा शाेध पाेलिसांनी सुरू केला असून सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटजेची पाहणी ही करण्यात येत आहे. याबाबत पुढील तपास विश्रांतवाडी पाेलिस करत आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement