वारकरी संप्रदायातील बंडातात्या कराडकर यांना पक्षघाताचा सौम्य झटका: पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू


  • Marathi News
  • Dvm originals
  • Bandatatya Karadkar Journey; Hospitalised In Pune | Varkari Sant | Anti Addiction Movement | Bandatatya Karadkar

पुणे8 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

वारकरी संप्रदायातील बंडातात्या कराडकर यांना पक्षघाताचा सौम्य झटका आला आहे. त्यांना उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थीर असून त्यांच्यावर वेळीच उपचार सुरू झाले असल्याचे सांगितले.

Advertisement

बंडातात्या कराडकर यांच्याकडे वारकरी संप्रदायातील धडाडीचे नेतृत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

व्यसनमुक्ती चळवळ, वारकरी संप्रदायाचे शिक्षण देणारी पहिली संस्था या कार्याबरोबरच कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कामही बंडातात्या कराडकर करतात. त्यामुळे त्यांची ओळख महाराष्ट्राला आहे. इतकेच नाही तर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देखील ते कायम चर्चेत असतात. बंडातात्या यांना पक्षघाताचा सौम्य झटका आला आहे. त्यांच्यावर सध्या पुण्यात एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement