वानखेडेंची घरवापसी: समीर वानखेडे पुन्हा ‘डीआरआय’च्या प्रादेशिक संचालक पदावर रुजू; दिल्लीत जाऊन स्वीकारला पदभार


  • Marathi News
  • National
  • Sameer Wankhede DRI | Marathi News | NCB Sameer Wankhede | Returned In Directorate Of Revenue Intelligence Dri

Advertisement

11 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आर्यन खान क्रुझ पार्टी प्रकरणातून बहुचर्चित आलेले, एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे बुधवारी पुन्हा महसूल गुप्तचर संचालनालयात (DRI) मध्ये जुन्याच पदावर रुजू झाले. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या प्रादेशिक संचालक पदावर वानखेडे रुजू झाले आहेत. वानखेडे एनसीबीमध्ये गेल्यापासून हे पद गेल्या काही दिवसांपासून रिक्त होते. ते पद आता पुन्हा एकदा समीर वानखेडे सांभाळणार आहेत.

Advertisement

समीर वानखेडे हे भारतीय महसूल सेवा (IRS)अधिकारी असून त्यांचा मूळ विभाग ‘डीआरआय’ आहे. ऑगस्ट 2020 मध्ये त्यांची नियुक्ती कर्ज श्रेणीत ‘डीआरआय’मधून ‘एनसीबी’मध्ये झाली होती. समीर वानखेंडेच्या एनसीबीतील कार्यकाळ हा सप्टेंबर 2021 मध्ये संपला होता.

मात्र त्यांना 31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर आता वानखेडे गुप्तचर संचालनालयात रुजू झाले आहेत. त्यांनी दिल्लीत जाऊन आपला पदभार स्वीकारला आहे. दरम्यान, एनसीबीच्या नवनियुक्त प्रभारी अधिकाऱ्यांनीही बुधवारी पदभार स्वीकारला आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement