नाशिक34 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
भाजप आमदार नीतेश राणे यांनी आज नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिराला भेट दिली व मंदिरात आरती केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत 13 मेरोजी मंदिराच्या प्रवेशद्वारावर घडलेल्या घटनेवर भाष्य केले.
धूपबाबतचा दावा चुकीचा
नीतेश राणे म्हणाले, त्र्यंबकेश्वर मंदिरात 13 मेरोजी जी घटना घडली, त्यावरून उलट हिंदू समाजाचीच बदनामी केली जात आहे. अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. उरूस निघतो तेव्हा मंदिराला धूप दाखवण्याची वर्षानुवर्षांची परंपरा आहे, असा दावा केला जात आहे. मात्र, हा दावा साफ चुकीचा आहे. मंदिराला धूप दाखवण्याची अशी कोणतीही परंपरा नाही. मी मंदिराच्या विश्वस्त मंडळाशी बोललो आहे. तज्ज्ञांनी बोललो आहे. त्यांनीही अशी कोणतीही परंपरा नसल्याचे सांगितले आहे.
युवक जिहादी विचारांचे
नीतेश राणे म्हणाले, येथे जो काही उरुस निघतो तो मंदिराच्या बाहेरच्या परिसरात निघतो व बाहेरच्या परिसरातूनच तो उरुस जातो. तेथे ते कोणाला धूप दाखवतात, याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही. मी तर म्हणेल 13 मेरोजी मंदिर बंद असताना जिहादी विचारांच्या युवकांनी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यांचा काय हेतू होता. हे हळूहळू तपासात समोर येईलच.
दर्शनाला आक्षेप नाही
नीतेश राणे, मंदिरात कोणाच्या येण्यावर आमचा आक्षेप नाही. तसा आक्षेप कोणाचाही नाही. मंदिरात तुम्हाला दर्शन घ्यायचे असेल तर हिंदु बाधवांप्रमाणे तुम्हीही रांगेत यावे. दर्शनाचे जे काही सामान आहे ते खरेदी करावे. रांगेत उभे राहून दर्शन घ्यावे व नंतर इतरांप्रमाणे निघून जावे. याला आमचा काहीच आक्षेप नाही. मात्र, 13 मेरोजी जे युवक आले, त्यांच्या हातात हिरवे झेंडे होते. हिरवे झेंडे हातात घेऊन मंदिरात जाण्याचा हट्ट ते का करीत होते. आतमध्ये जाऊन त्या युवकांना चादर चढवायची होती का?, असा सवाल नीतेश राणेंनी केला.
मविआ काळातही अशी घटना घडली
महाविकास आघाडी सत्तेत असतानाही अशीच घटना घडली होती, असा दावाही नीतेश राणेंनी केला. नीतेश राणे म्हणाले, मविआ असताना युवकांनी असाच प्रयोग करून पाहीला होता. आता कर्नाटक निकालामुळे त्यांच्या डोक्यात हवा भरलीये. मविआ असताना ते चार पावले मंदिरात गेले होते. मात्र, ते वेळीच लक्षात आल्याने त्यांना अडवले. आता त्यांची हिंमत वाढली होती. त्यामुळे पूर्ण मंदिरात जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, त्यांना वेळीच अडवण्यात आले. अन्यथा अनर्थ झाला असता, असे राणे म्हणाले.
हेही वाचा,
खडेबोल:आशिष शेलारांनी धडधडीत खोटी माहिती दिली, गोहत्येबाबत दाखवलेली क्लिप भाजप शासित राज्य मणिपूरची- अजित पवार
कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेवर येताच तिथे गोहत्या सुरू झाली, असा दावा करत भाजप नेते आशिष शेलार यांनी एक व्हिडिओ क्लिप पत्रकार परिषदेत दाखवली होती. मात्र, यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आशिष शेलारांना खडेबोल सुनावले आहेत. आज पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले, क्लिपबाबत आशिष शेलारांनी दिलेली माहिती चुकीची असून ती क्लिप भाजप शासित राज्य मणिपूरमधील असल्याचे समोर आले आहे. आशिष शेलार यांनी धडधडीत खोटी माहिती दिली आहे. तसेच, राज्यातील दंगली हाताळण्यात गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे अपयशी ठरले आहेत, अशी टीकाही अजित पवारांनी केली. वाचा सविस्तर