वादग्रस्त: देशातला पहिला अतिरेकी नथुराम गोडसे, कालीचरणची लायकी काय, त्याचे शिक्षण काय?, जितेंद्र आव्हाडांचा संताप अनावर


नाशिकएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

देशातला पहिला अतिरेकी नथुराम गोडसे आहे. कालीचारणची लायकी काय, त्याचे शिक्षण काय? महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह बोलणारा कालीचरण कोण? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे. नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरातून ते बोलत होते.

Advertisement

नथुराम गोडसे जेवढे वाचाल तेवढे त्यांचे भक्त व्हाल, गांधींचे विरोधक व्हाल. त्यांनी जे केले ते योग्यच होते, असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी कालीचरण महाराजांवर सडकून टीका केली आहे.

गोडसेचे उदात्तीकरण

Advertisement

जितेंद्र आव्हाड म्हणाले, कालीचरण बाबाला घरचे विचारत नाही. बाबा तुम्ही खूप दिवस टीव्हीवर दिसलेच नाही. मग काय बोलले महात्मा गांधींवर. पोर म्हटले हो बाब तुम्ही दिसले टीव्हीवर. नथुराम गोडसेचे उदात्तीकरण होणार. देशाचे वातावरण खराब होणार. महाराष्ट्रात दंगे पेटवले जाणार.

धर्म आणि दंगल

Advertisement

जितेंद्र आव्हाड म्हणाले, गेल्या 6 महिन्यातला राजकीय स्थियंतराचा राग लोकांच्या मनात दिसून येत आहे. ठिकठिकाणी मिळणारा अल्प प्रतिसाद त्यांना दिसत आहे. वाढलेली महागाई सर्व विपरीत परिस्थितीत एकच उपाय त्यांना दिसतो तो म्हणजे धर्म आणि दंगल. अशी स्पष्ट टिप्पणी करत आव्हाडांनी कालीचरण महाराजांचा समाचार घेतला आहे.

नव्या वादाला तोंड

Advertisement

कालीचरण महाराजांनी रायपूर येथील धर्मसभेत महात्मा गांधी यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांना 95 दिवस गजाआड देखील राहावे लागले. मात्र, त्यानंतरही त्यांची वादग्रस्त विधानाची मालिका संपलेली नाही. आता नथुराम गोडसेचे समर्थन करुन त्यांनी नव्या वादाला सुरुवात केली आहे.

काय म्हणाले कालीचरण महाराज?

Advertisement

आज कालीचरण महाराज पुन्हा बरळले आहेत. ते म्हणाले, नथुराम गोडसे जेवढे वाचाल तेवढे त्यांचे भक्त व्हाल, गांधींचे विरोधक व्हाल. त्यांनी जे केले ते योग्यच होते. महात्मा नथुराम गोडसे नसते तर धर्म बुडाला असता. त्यांना कोटी कोटी प्रणाम.

संबंधित वृत्त

Advertisement

वादग्रस्त:नथुराम गोडसे जेवढे वाचाल तेवढे त्यांचे भक्त व्हाल

सातत्याने वादग्रस्त विधान करणारे कालीचरण महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नथुराम गोडसे जेवढे वाचाल तेवढे त्यांचे भक्त व्हाल, गांधींचे विरोधक व्हाल. त्यांनी जे केले ते योग्यच होते, असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले आहे. आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर

Advertisement

बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement