जळगाव24 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
आर्थिक देवाण-घेवाणीवरुन वादग्रस्त ठरलेली जिल्हा सहकारी दूध संघाची कर्मचारी भरती अखेर रद्द करण्यात आली आहे. न्यायालयात प्रलंबित असलेल्या १०४ कर्मचाऱ्यांची भरती रद्द करीत असल्याचे प्रमाणपत्र दूध संघाकडून काेर्टात द्यावे असा ठराव शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, दूध संघ ताेट्यातून बाहेर निघत नाही ताेपर्यंत काेणतीही कर्मचारी भरती करणार नसल्याचे संचालक मंडळाच्या बैठकीत सांगण्यात आले. शनिवारी दूध संघाच्या संचालक मंडळाची बैठक अध्यक्ष आमदार मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
कर्मचारी भरती रद्द करणे, पाण्याचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. दूध संघाच्या अनावश्यक खर्चाला कात्री लावण्याचाही निर्णय घेण्यात आला. या आर्थिक वर्षात गेल्या आठ महिन्यापासून जिल्हा दूध संघ सतत ताेट्यात आहे. आठ महिन्याचा एकूण ताेटा १० काेटी ४५ लाखांवर गेला आहे. गेल्या आॅक्टाेबर २०२२ या महिन्यात संघाला ३ काेटी ११ लाखांचा तर नाेव्हेंबर २०२२ या महिन्यात २० लाख रूपयांचा ताेटा झाला हाेता. दरम्यान, या आर्थिक वर्षात एप्रिल २०२२ या महिन्यात ८५ लाख व त्यानंतर तब्बल ८ महिन्यांनंतर संघास डिसेंबर २०२२ या महिन्यात ९५ लाखांचा नफा झाला आहे.
शहर प्रतिनिधी | अमळनेर क्रेडीट कार्डसाठी ऑफरची बतावणी करून तरुणाची साडेसात लाखांत फसवणूक केल्याची घटना अमळनेर तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी जळगाव येथील सायबर पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील मूळ रहिवासी मिलिंद प्रकाश पाटील (वय २३) हे हल्ली पुण्यातील मान, हिंजेवाडीमधील भोयर वाडीत राहत असून ते पुण्यात खासगी नोकरी करतात. मिलिंद पाटील यांनी डिसेंबर २०२२मध्ये क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी ऑनलाइन मागणी केली होती. त्यांनी केलेल्या मागणीनुसार त्यांना क्रेडिट कार्ड उपलब्ध झाले होते.
त्यानंतर अज्ञात मोबाइलवरून वारंवार क्रेडिट कार्ड प्राप्त झाले का, याबाबत विचारणा केली जात होती. त्यानंतर या तरुणाला १८ ते १९ जानेवारीच्या दरम्यान एका मोबाइलवरुन फोन आला. समोरून बोलणाऱ्या अज्ञात व्यक्तीने पर्सनल लोन व क्रेडिट कार्डच्या ऑफर-बाबत मिलिंद पाटील यांना सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ऑनलाइन शॉपिंगसाठी पाच हजार रुपयांची ऑफर असल्याचे ताे सांगू लागला. तसेच ते व्हाॅऊचर वापरायचे असेल तर मोबाइलवर आलेला ओटीपी सांगा, असे त्याने सांगितले. यानंतर मिलिंद पाटील यांच्याकडून ओटीपी घेऊन त्यांच्या नावावरुन त्याने तब्बल ६ लाख ६९ हजार २६० रुपयांचे पर्सनल लोन घेतले. एवढेच नव्हे तर लोनची संपूर्ण रक्कम व त्यांच्या बँक खात्यातील ९० हजार ७४० रुपये असा एकूण ७ लाख ६० हजार रुपये एवढी रक्कम अज्ञात भामट्याने स्वतःच्या नावावर ट्रान्सफर करून घेतली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा नाेंद झाला आहे.